Mumbai Crime: 6 महिन्यांपासून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: 6 महिन्यांपासून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

मुंबई: मुरबे येथील एका अल्पवयीन असलेल्या महाविद्यालयीन (College) मुलीवर मागील ६ महिन्यांपासून बलात्कार (sexual assualt ) करून तिचा व्हिडियो (Video) व्हायरल करण्याची भीती दाखवून सामूहिक बलात्कार करणाऱ्या मुरबे येथील ३ तरुणाविरोधात बलात्कार, पोस्को अंतर्गत सातपाटी सागरी (SAGARI POLICE STATION) पोलिसांनी (police) गुन्हा दाखल केला आहे. पालघर (Palghar) न्यायालयाने आरोपींना 10 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Palghar Gang sexual assualt of a minor girl from 6 months)

मुरबे येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीचे आपल्याच गावातील (village) तारापूर औद्योगिक वसाहती मधील कारखाण्यात काम करणाऱ्या हर्षल देव रा.मुरबे (वय-22) याच्याशी प्रेम जडले होते. या प्रेम संबंधातून त्याची अनेक वेळा जवळीक वाढल्याने आरोपी (Accused) प्रियकराने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. परंतु, मी अजूनही अल्पवयीन असल्याने मी सज्ञान झाल्यावर लग्न (married) करू असे त्या मुलीने त्याला समजावून सांगितले.

हे देखील पहा-

परंतु, हर्षलने जबरदस्ती करत तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित करून त्याचा एक व्हिडिओ ही काढला होता. या व्हिडिओची अनेक दिवस मजा लुटून हर्षलने तो व्हिडीओ आपल्या काही मित्रांना दाखवला होता. या व्हिडिओचा दुरुपयोग करत त्याचे मित्र अभिषेक देव आणि तुषार नलावडे दोघेही राहणार मुरबे हे आरोपी आपल्या मित्राच्या प्रेयसीशी थेट संपर्क साधून मित्राशी शरीर संबंध प्रस्थापित केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल करण्याची भीती दाखवत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. (Palghar Gang sexual assualt of a minor girl from 6 months)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास गावात सर्वत्र आपली आणि आपल्या कुटुंबियांची बदनामी होईल. या भीतीतून गेल्या अनेक महिन्यापासून तिच्याशी प्रियकर आणि त्यांच्या मित्राने आपल्याशी संबंध ठेवल्याचे त्या मुलींनी तक्रारीत सांगितले आहे. वारंवार जबरदस्तीने व्हिडीओचा धाक दाखवत आतापर्यंत तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार करण्यात आले आहे. असल्याची माहिती पुढे येत आहे. त्या तरुणीकडे वारंवार शरीर सुखाची मागणी वाढू लागल्याने मानसिक खच्चीकरण झालेल्या त्या मुलीने आपल्या आत्याला आपल्यावर झालेल्या अत्याचाराची सर्व हकीकत सांगितली.

त्यानंतर त्या तरुणींनी आपल्या कुटुंबियांसह सातपाटी सागरी पोलीस ठाणे गाठले, आणि ३ आरोपी विरोधामध्ये सामूहिक बलात्कार, आणि लैगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण (पोस्को) आदी कलमान्वये सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना सोमवारी पालघर न्यायालयात हजर केले असता त्यांना १० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती सपोनि सुधीर धायरकर यांनी यावेळी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

MVA News : मविआचा जागावाटपाचा तिढा सुटणार?

IND vs BAN 1st Test: W,W...आकाश 'दीप' पेटला! लागोपाठ 2 चेंडूंवर उडवल्या त्रिफळा; पाहा VIDEO

Patoda Bajar Samiti : पाटोदा बाजार समितीची ८१ गुंठे जमीन परस्पर विक्री; माजी सभापती विरोधात २६ वर्षांनी गुन्हा दाखल

Astrology Tips : काही केल्या लग्न जुळत नाहीये? वास्तुशास्त्रात दिलेले 'हे' उपाय एकदा करून तर पाहा

SCROLL FOR NEXT