Palghar news Saam Tv
मुंबई/पुणे

Palghar Crime News : अशोक धोडी हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक, हत्येचं गुजरात कनेक्शन उघड

Ashok Dhodi Case : पालघरमधील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात आरोपी सूरज धोडीला पोलिसांनी गुजरातहून अटक केली आहे.

Yash Shirke

रुपेश पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

Palghar Crime : पालघरमधील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्याचे अपहरण करुन मग हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणातील पाचवा आरोपी (सूरज धोडी) याला काल अटक करण्यात आली होती. त्याला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अशोक धोडी हत्याप्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले होते. या चार आरोपींना न्यायालयासमोर सादर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. काल (६ फेब्रुवारी) पालघर स्थानिक गुन्हे शाखेने गुजरातमधील भिलाड परिसरातून सूरज धोडीला ताब्यात घेतले. आज त्याला डहाणू न्यायालयात हजर केले.

डहाणू न्यायालयाने सूरज धोडीला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी सूरज धोडी हा अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणात महत्त्वाची भूमिका असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणातील दोन फरार आरोपींपैकी मुख्य आरोपी सूरज धोडीच्या संपर्कात असल्याचाही पोलिसांना शंका आहे.

अशोक धोडी यांचे १२ दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. अपहरणाच्या १२ व्या दिवसानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये आढळला. गुजरातच्या एका खाणीमध्ये त्यांची कार सापडली होती. कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडी यांचा मृतदेह होता. या हत्या प्रकरणामुळे पालघरसह महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Rule Change : आरबीआयनं नियम बदलले, ऑटो-पेमेंटची ती अट कायमची बंद, वाचा सविस्तर

FIR against minister: गृहमंत्र्यांवर FIR दाखल करा, कोर्टाचे आदेश; कबड्डी सामन्यात लावली होती ५०० रुपयांची पैज

Health Care: सतत थकवा, अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होतोय? मग शरीरात असू शकते ‘ही’ कमतरता; वेळीच व्हा सावधान

Badlapur News: नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा; राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये हमरीतुमरी

Maharashtra News Live Update: नारा नदी पुलाखाली आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह

SCROLL FOR NEXT