Pune PFI News Saam TV
मुंबई/पुणे

PFIच्या आंदोलनात 'पाकिस्तान जिंदाबाद'च्याच घोषणा, 'साम' टीव्हीकडे व्हिडीओ; अल्ट न्यूजचा दावा खोटा

साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात ही घोषणाबाजी शूट झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune News : पुण्यातील 'पीएफआय'च्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनात 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या नव्हत्या, असा दावा 'अल्ट न्यूज' या फॅक्ट चेक करणाऱ्या न्यूज पोर्टलने केला होता. मात्र हा दावा खोटा निघाला आहे. साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात ही घोषणाबाजी झाल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी झाल्याचा साम टीव्हीचा दावा खरा ठरला आहे.

अल्ट न्यूज खोटा दावा का करत आहे हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. साम टीव्हीच्या व्हिडीओ फूटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की पोलीस व्हॅनमध्ये बसलेल्या आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. पोलीस देखील व्हिडीओजची तपासणी करुन कारवाई का करत नाही हा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे.

अल्ट न्यूजने काय दावा केला होता?

ज्या कॅमेरामध्ये शूट झालेल्या व्हिडिओमध्ये 'पॉपुलर फ्रंट जिंदाबाद' अशा घोषणा देण्यात येत असल्याचं ऐकू येत आहेत. तर व्हायरल व्हिडिओमध्ये फक्त 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा ऐकू येत असल्याचे अल्ट न्यूजने म्हटलं होतं.

देश विघातक कृत्य केल्याच्या संशयावरून केंद्रीय तपास यंत्रणेने पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या कार्यालयांवर धाडसत्र राबवले होते. याच पीएफआय कार्यकर्त्यांनी 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यानंतर 'पीएफआय'च्या कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दिली.

उपमुख्यमंत्र्यांनी सदर माहिती दिल्याच्या अवघ्या काही तासानंतर पुणे पोलिसांनी 'पीएफआय'च्या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले राजद्रोहाचे गुन्हे रदद् करण्यात आले आहे. राजद्रोहाचा गुन्हा रद्द केल्याची माहिती पुणे शहरातील बंड गार्डन पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

World : जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हनिमूनसाठी सर्वात रोमँटिक ठिकाण

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

SCROLL FOR NEXT