Devendra Fadnavis- Chandrakant Patil  Saam TV
मुंबई/पुणे

सावधान! आमचा 'दुसरा बॉम्ब' येतोय, चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा

देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या पेन ड्राईव्ह बॉम्ब नंतर आता दुसरा बॉम्ब टाकणार असल्याचं पाटील म्हणाले आहेत.

आश्विनी जाधव केदारी

पुणे: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात एक बॉम्ब टाकला तो म्हणजे पेन ड्राईव्ह बॉम्ब. त्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. यावर चंद्रकांत पाटलांनी आता नका खुलासा केला आहे. एका पेन ड्राईव्हद्वारे फडणवीसांनी सगळी माहिती सादर केली आहे. विरोधी पक्ष नेते सत्ताधाऱ्यांची प्रकरणे बाहेर काढतात, त्यांना कुठून माहिती मिळते हे विचारायचं नसतं, त्याने ते काम करू शकणार नाही.

2 रा बॉम्ब येतोय, 1 ल्याच बॉम्ब ला चडीचूप होताय, पण आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय, आम्ही घाबरण्यातले लोक नाही, चळवळीतले लोक आहोत असे म्हणत पाटलांनी 2 ऱ्या बॉम्बचा इशारा दिला आहे. कोर्ट BJP ने थोडीच विकत घेतलं आहे का? केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात खुशाल कोर्टात जावं असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. परंतु या अधिवेशनात सर्वात चर्चेचा विषय ठरला तो देवेंद्र फडणवीसांचा 'पेन ड्राईव्ह बॉम्ब'. याच पेन ड्राईव्ह बॉम्बने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या प्रकरणावर या अगोदरही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की संबंधीत प्रकरणाची आम्ही सीबीआय चौकशी मागणार, कोर्टात जाणार. पुढे ते म्हणाले की सीबीआय सगळंच काढेल, क्लिप्स खऱ्या आहेत की खोट्या.

आज सायबर क्राईचे काही अधिकारी देवेंद्र फडणवीस यांची चौैकशी करत आहेत. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग आणि बदल्यांच्या रॅकेट प्रकरणी चौकशी सुरु आहे. परंतु यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षांचा अधिकार हिरावून घेतला जातोय अशी चौकशी करता येत नाही असेही भाजप नेते म्हणत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT