Arrest Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी व्यावसायिकाला अटक; ओशिवरा पोलिसांची कारवाई

कोरिओग्राफर आणि अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी लुकआउट नोटीसवर असलेल्या एका व्यावसायिकाला अटक केली आहे.

सुरज सावंत

Mumbai Crime News : ओशिवरा पोलिसांच्या (Police) विशेष पथकाने बॉलीवूड कोरिओग्राफर आणि अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी लुकआउट नोटीसवर असलेल्या एका व्यावसायिकाला अटक केली आहे. रोहित कपूर उर्फ ​​रितेश केशवानी असे अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव असून तो मूळचा छत्तीसगडचा आहे.

रोहितवर याच्यावर ओशिवरा मालवणी, नवसारी आणि दिडोंशी पोलीस ठाण्यात महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवणी आणि दिडोंशी पोलिसांनी त्याला याआधी देखील अटक केली होती. मात्र, तेव्हा त्याची जामिनावर सुटका झाली होती. जामिनावर असताना आरोपी वारंवार गैरकृत्य करत राहिला. त्यानुसार त्याच्यावर नुकताच एक गुन्हा दाखल केला होता.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अटकेच्या भीतीने तो श्रीलंकेला पळून जात असताना ओशिवरा पोलिसांनी त्याला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. ओशिवरा परिसरात राहणाऱ्या ४८ वर्षीय कोरिओग्राफर आणि अभिनेत्रीच्या तक्रारीवरून रोहितविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

Face Care: पिंप्लस, डाग आणि टॅनिंग कमी करायची आहे? मग हा घरी तयार केलेला कुलिंग फेसपॅक करा ट्राय

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

राज्यातील प्रशासनात उलटफेर; 4 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Yavtmal : ह्रदयद्रावक! खेळता खेळता कुलरजवळ गेला, पाण्यात हात घालताच शॉक लागून १४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT