Only 40 objections in a week regarding the ward structure of Pune Municipal Corporation Election Saam TV
मुंबई/पुणे

PMC Election 2022: पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबत आठवड्याभरात केवळ ४० हरकती

PMC Election 2022 Ward Composition: प्रभाग रचनेबाबत नगरसेवकांमध्येदेखील नाराजी असून, हक्काचा मतदार दुसऱ्या प्रभागात केल्याने त्यांची चिंता वाढली आहे.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली, यावर नागरिकांकडून 7 दिवसांत फक्त ४० हरकती आणि सूचना आलेल्या आहेत. हरकती नोंदवण्यासाठी १४ फेब्रवारीपर्यंत मुदत आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) १ फेब्रुवारी रोजी प्रारूप विकास आराखडा जाहीर केला. यावेळी तीन सदस्यांचा प्रभाग असल्याने २०१७ च्या तुलनेत ही प्रभाग रचना (Ward Structure) पूर्णपणे वेगळी आहे. काही प्रभाग दोन, तीन चार, भागात विभागले आहेत. सोसायट्या, वस्त्यांचीही विभागणी झाली आहे. प्रभाग रचनेबाबत नगरसेवकांमध्येदेखील नाराजी असून, हक्काचा मतदार दुसऱ्या प्रभागात केल्याने त्यांची चिंता वाढली आहे. (Only 40 objections in a week regarding the ward structure of Pune Municipal Corporation)

पुणे महापालिकेच्या (PMC) निवडणूक शाखेकडे १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान, ४० हरकती आणि सूचना आलेल्या आहेत. निवडणूक शाखेने जाहीर केलेल्या अधिसूचना आणि नकाशा एक सारखे नाही. जो भाग नकाशात आहे, तो अधिसूचनेत नाही आणि जो अधिसूचनेत नाही तो नकाशात आहे असे प्रकार घडल्याने नागरिक आणि स्थानिक पुढारीही संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे प्रभाग रचनेचा अभ्यास अद्यापही सुरू असून, उर्वरित दिवसात हरकती आणि सूचना येण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना उस दरासाठी आक्रमक

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी अपडेट; मास्टरमाईंडचे घर उडवले, सुरक्षा दलांची कारवाई

Bihar Election Result Live Updates: पोस्टल मतमोजणी संपली, सुरूवातीचे कल एनडीएच्या बाजूने

Accident News : नवले पुलाचा उतार ठरतोय मृत्यूचा सापळा, वर्षभरातील अपघाताचा आकडा धक्कादायक, घटनेला जबाबदार कोण?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी टेन्शन वाढवणारी बातमी! 'या' जिल्ह्यातून २४ हजार महिला अपात्र; यादीत तुमचे नाव तर नाही ना?

SCROLL FOR NEXT