Online Fraud Cyber Crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune Online Fraud: धक्कादायक! महागड्या गाड्यांची हौस भागवण्यासाठी ४४ पुणेकरांना ऑनलाइन गंडा; कोट्यवधी रुपयांची फसवणूक

Pune Online Fraud Crime: महागड्या गाड्यांमधून फिरण्याचे स्वप्न पाहणारे आता तुरुंगाची हवा खात आहेत.

Dnyaneshwar Choutmal

Online Fraud News: ऐशा आरामी आयुष्य जगण्यासाठी आणि महागड्या गाड्यांची हौस भागवण्यासाठी पुणेकरांना (Pune) ऑनलाइन गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या आरोपीने एक दोन नाही तर 44 जणांना गंडा घालत कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली. या धक्कादायक प्रकाराने चांगलीच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या ट्रेंडसोबतच ऑनलाइन फसवणुकीच्या (Online fraud) घटनांमध्येही वाढ होते आहे. पुण्यामधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये राहुल राठोड आणि ओमकार सोनोने या दोन तरुणांनी तब्बल ४४ जणांची फसवणूक करत महागड्या गाड्या खरेदी केल्याचे समोर आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

घटनेतील मुख्य आरोपी राहुल राठोड हा क्रिप्टोबीज ट्रेडिंग प्राइवेट लिमिटेड कंपनीचा मालक आहे. याच कंपनीच्या नावावर त्याने लोकांना स्टेकिंग प्रोग्राममध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवून लोकांकडून पैसे जमा केले. याच पैशातून आरोपींनी महागड्या गाड्या खरेदी केल्या.

सापळा रचून पोलिसांनी केली अटक...

मात्र अखेर फसवणुकीची ही गोष्ट पोलिसांना समजली आणि पोलिसांनी सापळा रचून आरोपींना बेड्या ठोकल्या. ऐशा आरामी आयुष्य जगण्याचे आणि महागड्या गाड्यांमधून फिरण्याचे स्वप्न पाहणारे आता तुरुंगाची हवा खात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT