Bandra Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Bandra Crime News: वांद्रे येथे तिघांचा एकावर गोळीबार, पूर्ववैमन्यस्यातून हल्ला

गोळीबार करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहे.

सुरज सावंत

मुंबई: पूर्ववैमन्यस्यातून एकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या वांद्रे परिसरात घडली. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीवर सध्या भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, गोळीबार करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहे. मात्र, परिसरात सध्या दहशतीचं वातावरण आहे (One shot at Bandra by three case filed by police).

वांद्रे रिक्लेमेशनजवळील झोपडपट्टी येथे गोळीबार (Firing) झाला. पूर्ववैमन्यस्यातून तिघांनी एकावर गोळीबार केल्याची माहिती आहे. या गोळीबारात एकजण जखमी झालाय. या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव रियाज अन्सारी असून त्याच्यावर सध्या भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गोळीबार करणाऱ्या तीनही आरोपींची ओळख पटली आहे. पप्पू पेजर, मुन्ना, अकबर पठाण अशी गोळीबार करणाऱ्या तिघांची नावे आहेत, असं रियाज अन्सारीने पोलिसांना (Police) सांगितले. गोळीबार करुन हे तिघे एसव्ही रोडच्या दिशेने दुचाकीहून पळून गेल्याचं तक्रारदाराने सांगितलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या तिघांचा शोध सुरु आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT