apmc market, navi mumbai, rain saam tv
मुंबई/पुणे

APMC Market : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील छप्पर काेसळलं

सध्या कोसळलेले छप्पर बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई (navi mumbai) येथे हाेत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) तसेच जोरदार वाऱ्यामुळे वाशी (vashi) येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (apmc market) मधील कांदा बटाटा मार्केटमध्ये असणाऱ्या लिलाव हॉल वरील लोखंडी छप्पर आज अचानक कोसळले. (APMC Market News)

एपीएमसी मार्केट मधील गाळे धोकादायक अवस्थेत असून याची पुनर्बांधणी व्हावी अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. आज (मंगळवार) लिलाव हॉल मधील छप्पर कोसळल्याने पुनर्बांधणीचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.

या घटनेत सुदैवाने छप्पर खाली कोणीही नव्हते. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. यावेळी मार्केटमध्ये उपस्थित असणा-या वाहनधारकांनी त्यांची वाहनं छप्पर पडल्यानंतर बाजूला लावली. सध्या कोसळलेले छप्पर बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT