संजय गडदे
Mumbai News : मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेकडील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. जेवण बनवण्यासाठी गॅस स्टोव्ह सुरू केला असता एलपीजी गॅस सिलिंडरला गळती झाली. ज्यामुळे लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना आज (सोमवारी) सकाळी घडली आहे.
हरीश बेचैन चव्हाण (५५ वर्षे) असं आगीत होरपळून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोरेगाव पोलिसांनी मृत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. तसेच याप्रकरणी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिमेकडील प्रेमनगर परिसरात हरीश चव्हाण आणि त्याचा एक साथीदार आज (सोमवारी) सकाळी कामावर निघण्यापूर्वी घरी जेवण बनवण्याची तयारी करत होते. (Mumbai News)
यासाठी लाईटरने शेगडी पेटवण्याचा प्रयत्न केला असता आगीचा भडका उडाला ही आग विझवण्याचा प्रयत्न करत असतानाच हरीश चव्हाण यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. यात हरी श चव्हाण हे भाजून गंभीर जखमी झाले.
त्याच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीने हरीश यांना वाचवण्याचा प्रयत्नही केला मात्र भाजलेल्या जखमा जास्त असल्यामुळे हरीश यांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.