Thane Crime News saam tv
मुंबई/पुणे

Thane Crime News : ठाण्यात गोळीबार, एक जखमी; पाेलिस घटनास्थळी दाखल

ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला त्याच्यासोबत त्याचे सहकारी देखील होते.

विकास काटे

Thane News : ठाण्यातील (thane) घंटाळी मंदिर रोड परिसरात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या घटनेत एकजण जखमी झाला आहे. (Thane Breaking Marathi News)

ठाण्यातील घंटाळी मंदिर रोड परिसरात झालेला गोळीबार हा दोन गटांमध्ये संपत्तीच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पाेलिस कसून तपास करीत आहेत. परिसरातील नागरिकांकडून माहिती घेतली जात आहे. (Maharashtra News)

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे (thane) घंटाळे परिसरात पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला आहे. हा दोन गटांमधील वाद असण्याची शक्यता आहे. संपत्तीच्या वादातून हा प्रकार झाल्याचं समजत आहे. ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला, त्याच्यासोबत त्याचे सहकारी देखील होते.

आपल्या कार्यालयातून ते रात्रीच्या वेळी ते दिवाळी निमित्त कंदील पुरवण्याचं काम करत होते. त्याचवेळी हल्लेखोर तिथे पोहोचले आणि गोळीबार केला. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT