Corona patient Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईची चिंता वाढली; २ महिन्यांनंतर ' अशी ' आहे कोरोना परिस्थिती

नरेश शेंडे

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईत कोरोनाचा संसर्ग (corona infection) आटोक्यात आला होता. मात्र, आज (corona new patient) मंगळवारी नव्या १०२ कोरोना रुग्णांची भर पडल्याने मुंबईत कोरोनाने पुन्हा एकदा हात पाय पसरले आहेत. २७ फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच मुंबईत (Mumbai) कोरोनाच्या सर्वाधीक रुग्णसंख्येची नोदं झालीय. त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या १०,५९,४३३ वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आज (zero corona death) एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

त्यामुळे कोरोना मृत्यूंच्या संख्येत कोणताही बदल झाला नसून १९५६२ एवढ्यावरच रुग्णसंख्या राहिली आहे. तसंच रविवारी कोरोनाच्या ४५ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे दोन दिवसात ही रुग्णसंख्या दुपटीनं वाढली आहे. यावर्षी २७ फेब्रुवारीला १०३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आकडा शंभरीपार गेला आहे. तसंच २ मार्चलाही १०० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT