PCMC मध्ये ओमिक्रॉनचा पहिला बळी; नायजेरियातून आलेल्या व्यक्तीचा मृत्यू Saam Tv
मुंबई/पुणे

PCMC मध्ये ओमिक्रॉनचा पहिला बळी; नायजेरियातून आलेल्या व्यक्तीचा मृत्यू

मात्र उपचारादरम्यान 28 डिसेंबर त्या रुग्णाचा मृत्यू झाला.

गोपाल मोटघरे

पुणे : नायजेरियातून आलेल्या 52 वर्षीय ओमिक्रॉन ग्रस्त रुग्णाचा पिंपरी चिंचवड शहरात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्य झाला आहे. वाय सी एम हॉस्पिटल मधील रुबी अल्केअर केंद्रात उपचार घेत असताना ओमिक्रॉनने (Omicron Variant) ग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नायजेरिया तुन पिंपरी चिंचवड (PCMC) मध्ये आलेल्या रुग्णाचा प्राथमिक चाचणीत कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याच्यावर वाय सी एम हॉस्पिटल मधील रुबी अल्केअर केंद्रात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान 28 डिसेंबर त्या रुग्णाचा मृत्यू झाला.

मात्र मृत्यू झालेल्या व्यक्तीचा आज अहवाल आल्यानंतर तो ओमियक्रॉन ग्रस्त असल्याचे उघड झाले आहे. ओमिक्रॉन मुळे मृत्यू झालेल्या रुग्णाला 13 वर्षांपासून मधुमेहाच आजार असल्याची माहिती देखिल पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत परदेशातून आलेल्या 32 कोरोना (Coronavirus) ग्रस्त रुग्णांपैकी 14 रुग्णांना ओमियक्रॉनचा संसर्ग झाला आहे. तर त्यांच्या निकट सहवासात आलेल्या 11 जणांना देखिल ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT