मुंबई/पुणे

Mumbai Crime News: क्षुल्लक वादातून सख्ख्या भावांवर तलवारीने हल्ला, एकाचा जागीच मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद

Trombay Police: या घटनेमुळे ट्रॉम्बे परिसरात (Trombay Area) एकच खळबळ उडाली आहे.

Priya More

जयश्री मोरे, मुंबई

Trombay News: मुंबईतल्या अनुशक्तीनगरमध्ये (Anushakti Nagar) दोन सख्ख्या भावांवर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये एका भावाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे ट्रॉम्बे परिसरात (Trombay Area) एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ट्रॉम्बेच्या चित्ता कॅम्पमध्ये ही घटना घडली. शुल्लक कारणावरुन काही तरुणांमध्ये वाद झाला. या वादानंतर मलिक शेख नावाच्या तरुणावर आणि त्याच्या भावावर तलवारीने वार करण्यात आले. या वादामध्ये मलिकचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला.

जीवघेणा हल्ल्याची ही घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे. या घटनेचा माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. जखमी झालेल्या मलिकच्या भावाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मलिकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी (Trombay Police) रात्री उशिरा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खराडी भागात आगीची घटना

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

SCROLL FOR NEXT