Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

पवार साहेबांनी बजावलं, पहाटे ४.३० पर्यंत काम केलं, महिलादिनी अजित दादांनी सांगितला 'तो' किस्सा

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यक्रमात बोलत असताना अजित पवारांनी किस्सा सांगितला.

सुरज सावंत

मुंबई : पवार साहेबांनी (Sharad Pawar) बजावल्यामुळे पहाटे ४.३० पर्यंत काम करत होतो. महिला दिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार मंत्री असताना महिलांसदर्भात कायदा करतानाचा प्रसंग सांगितला. ते आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या (International Women's Day) कार्यक्रमात बोलत होते. ते आपल्या भाषणात म्हणाले, स्त्री-पुरुष समानता असली पाहिजे हे आपण बोलतो. मात्र कोरोना (Corona) काळात दोघांनी तेवढ्याच ताकदीने काम केलं हे जगाने पाहिलं आहे.

शरद पवार साहेबांनी सातत्याने महिलांसंदर्भातल्या कामात पुढाकार घेतला आहे. पवार साहेब मंत्री असतान महिलांसंदर्भात कायदा केला आणि महिलांना आरक्षण मिळालं. या बिलाचं काम रात्रभर सुरु होतं, जो पर्यंत बिलाचं काम होत नाही तो पर्यंत जायचं नाही. असा आदेश साहेबांचा होता. पहाटे साडेचारला आम्ही पहिलं महिला धोरणाचं बिल मंजूर केलं. आम्ही पवार साहेबांना सांगितलं होतं की, उद्या करु पण बिल पास झाल्याशिवाय जायचं नाही हे आम्हाला बजावलं होतं अशी आठवण देखील त्यांनी यावेळी अजितदादांनी (Ajit Pawar) सांगितली.

दरम्यान यावेळी पवार यांनी महिला व बाल विकास मंत्री यशोमतीं ठाकूर (Yashomati Thakur) यांचे महिलांबाबतच्या धोरणांसाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत खरतर आम्हाला आज महिला धोरण आणायचं होतं. मात्र कुठे ना कुठे काही ना काही गोष्टी राहतात. पण मार्चमध्ये आम्ही ते आणणार, कुठलाही महिलाचा घटक वंचित राहू नये हे त्यामागचं कारण असल्याचं अजित पवरांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: नाशिक शहरात सकाळपासून पावसाने घेतली विश्रांती

Lung Cancer Stage 1: फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या स्टेज 1 मध्ये ही 5 लक्षणं दिसून येतात; शरीर देत असलेले संकेत वेळीच ओळखा

School Closed : शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, नाशिक जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Mumbai Tourism : वीकेंडला जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा, 'ही' आहेत मुंबईतील रोमँटिक अन् सुंदर ठिकाणे

Hingoli Accident: महामार्गावर भयंकर अपघात! खड्ड्यात कार आदळून उलटली, २ तरुणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT