Omicron : मंत्रालयाताले बायोमेट्रीक पद्धत स्थगित!  SaamTvNews
मुंबई/पुणे

Omicron चा परिणाम, मंत्रालयातील बायोमेट्रीक प्रणाली बंद!

कोरोना विषाणुच्या “ओमायक्रॉन” व्हेरियंटमुळे रूग्ण वाढीचा दर दिवसेंदिवस उंचावत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-वैदेही काणेकर

मुंबई : मंत्रालयातील तसेच राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांची कार्यालयीन उपस्थितीची नोंदणी बायोमेट्रीक प्रणालीवर करण्यात येत असल्याने त्यामधून रोगप्रसाराचा अधिक धोका असल्याने सदर प्रणाली तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करणे अत्यावश्यक आहे.

कोरोना विषाणुच्या “ओमायक्रॉन” व्हेरियंटमुळे रूग्ण वाढीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कार्यालयीन उपस्थिती बायोमेट्रीक प्रणाली संदर्भात खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

मंत्रालय व नवीन प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांची कार्यालयीन उपस्थिती नोदविण्यासाठी बसविण्यात आलेल्या बायोमेट्रिक मशिन्स पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे, उपस्थिती नोंदविताना होणारी गर्दी व गोंधळ टाळण्यासाठी मंत्रालय व नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर बायोमेट्रिक मशिन्स बसविण्याबाबत माहिती तंत्रज्ञान विभागाने १५ दिवसात कार्यवाही करावी.

मंत्रालय व नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर बायोमेट्रिक मशिन्स माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत बसविण्यात येईपर्यंत, मंत्रालय व नवीन प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांच्या कार्यालयीन उपस्थितीकरिता बायोमेट्रीक प्रणालीचा वापर पुढील आदेशापर्यत स्थगित करण्यात येत आहे

मंत्रालय व नवीन प्रशासकीय इमारती व्यतिरिक्त, राज्यातील इतर सर्व शासकीय

कार्यालयांमधील अधिकारी / कर्मचारी यांच्या कार्यालयीन उपस्थिती संदर्भात संबंधित

कार्यालयामध्ये पुरेशी बायोमेट्रीक मशिन्स उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने संबंधित कार्यालय प्रमुखांनी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. सद्यः स्थितीत बायोमेट्रीक उपस्थिती प्रणालीचा वापर दिनांक ३१ जानेवारी, २०२२ पर्यंत स्थगित करण्यात यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : काँग्रेसकडून आदिती पोहरे अमरावती शिक्षक मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात

Suranachi Bhaji : सुरणाच्या पानांपासून बनवा 'हा' पदार्थ, डायबिटीज ठेवेल कंट्रोलमध्ये

Saturday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 6 राशींचे भाग्य उजळेल; वाचा शनिवारचे राशीभविष्य

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT