OBC आरक्षणासाठी राज्य सरकार सुधारित अध्यादेश काढण्याची शक्यता Saam Tv
मुंबई/पुणे

OBC आरक्षणासाठी राज्य सरकार सुधारित अध्यादेश काढण्याची शक्यता

अध्यादेशाबाबत राज्यपालांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्य सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) राज्य सरकार (State Government) सुधारित अध्यादेश काढण्याची शक्यता आहे. अध्यादेशाबाबत राज्यपालांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्य सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सरकार सुधारित अध्यादेशाला मंजूरी देऊन तो पुन्हा स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे पाठवणार आहे.

दरम्यान राज्यात पुढच्या वर्षी मुंबईसह पंधरा महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या महापालिकेत प्रभाग पद्धती कशी असावी, तसेच नगरपंचायत आणि नगरपालिकांमध्ये प्रभाग पद्धत कशी असावी यावर आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत महाविकास आघाडीतील नेत्याची चर्चा झाली आहे.

पंधरा पैकी मुंबई महापालिकेत सध्याची एक प्रभाग पद्धत कायम राहणार तर उरलेल्या महापालिकेत दोन की चार प्रभाग पद्धती असावी यावर आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर यासह काही महापालिकेत दोन सदस्य प्रभाग पद्धत रहावी अशी काही नेत्याची भूमिका आहे. नगरपंचायतीत एक सदस्य प्रभाग पद्धत, तर नगरपालिकांमध्ये दोन सदस्य प्रभाग पद्धत असण्याची शक्यता आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या या प्रस्तावावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT