Lockdown In Maharashtra SaamTV
मुंबई/पुणे

Lockdown In Maharashtra: महाराष्ट्रात लॉकडाऊन नाही, निर्बंध कडक होणार

महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार नसल्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

Lockdown In Maharashtra: मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाऊन (Lockdown) लागणार नसल्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण, निर्बंध मात्र कडक होणार आहेत, अशी माहिती आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमिवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, तुर्तास तरी राज्यात लॉकडाऊन लागणार नाही, असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे (No Lockdown In Maharashtra For Now).

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) आज एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला आरोग्य विभागाचे मंत्री, अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत टास्कफोर्ससोबत चर्चा करण्यात आली. राज्यसरकारने आपली भूमिका या बैठकीत स्पष्ट केली आहे. लॉकडाऊन (Lockdown) नाही ही भूमिका राज्यसरकारने घेतली आहे. परंतू निर्बंध कडक केले जाणार आहेत. रुग्णसंख्या वाढत चालली आहे. पण, मृत्यूदर कमी आहे. पॉझिटीव्हीटी रेट वाढतोय, ही चिंतेची बाब आहे. त्यावर या बैठकीत चर्चा झाली. तसेच, खाटांची संख्या किती वाढवावी, आयसीयू बेड्स किती वाढवावे या सर्वच बाबींवर या बैठकीत चर्चा झाली. पण, लॉकडाऊन नको ही भूमिका राज्यसरकारने घेतली आहे. पण, निर्बंध कडक होणार आहेत.

यामध्ये हॉटेल्स, दुकानांच्या वेळा कमी केल्या जातील, गर्दी कशी टाळता येईल याबाबतही विचार केला जाईल. लग्न संमारंभ, राजकीय कार्य़क्रमांवर आधीच निर्बंध घातलेले आहेत. झालेल्या बैठकीत टास्कफोर्सने काही सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी कशी केली जाईल. त्यामध्ये काय अडचणी येतील यावरही विचार झाला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळवलं जाईल, त्यानंतर ते यावर निर्णय घेतील.

Updated By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, बड्या नेत्यासह अनेक नगरसेवकांना फोडलं; लवकरच पक्षप्रवेश होणार

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सन्मान

Chakolya Recipe : 'चकोल्या' ही रेसिपी कधी खाल्ली आहात का? फक्त खमंग वासानेच पोट भरेल

Shocking : ७ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, नामांकित मॉलच्या बेसमेंटमध्ये आरोपीचं भयंकर कृत्य

Office Tips : मीटिंगमध्ये सगळ्यांसमोर बॉस तुमच्यावर ओरडतो? 'या' ८ टिप्स नक्की फॉलो करा

SCROLL FOR NEXT