Nitin Raut Saam TV
मुंबई/पुणे

नितीन राऊत भारत जोडो यात्रेत जमखी, मात्र शिंदे-फडणवीस सरकारला का जबाबदार धरलं जातंय?

नितीन राऊत यांच्यावर सध्या हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : काँग्रेस नेते नितीन राऊत (Nitin Raut) हे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. तेलंगणा येथे राहुल गांधी यांचा ताफा आला त्यावेळी मोठी गर्दी उसळली. दरम्यान गर्दी नियंत्रित करताना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचं नितीन राूत यांनी सांगितलं.

नितीन राऊत यांच्यावर सध्या हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या डोळ्याला इजा झाली आहे. मात्र नितीन राऊत यांच्यासोबत झालेल्या प्रकाराबद्दल महाराष्ट्रातील शिंदे -फडणवीस सरकारला जबाबदार धरल जात आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने काही दिवसांपूर्व संजय राऊत, भास्कर जाधव, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील 17 नेत्यांची सुरक्षा काढून घेतली. यामध्ये नितीन राऊत यांचाही समावेश होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नितीन राऊत यांच्यासोबत पोलिसांची सुरक्षा नव्हती.

जर नितीन राऊत यांना पोलीस सुरक्षा असती तर कदाचित ही घटना घडली नसती. नितीन राऊत राज्यातील बडे नेते आहेत. त्यामुळे ते परराज्यात गेले असते तरी त्यांना पोलीस सुरक्षा कायम राहिली असती. पोलीस सुरक्षा असती तर नितीन राऊत कोण आहेत हे कदाचित गर्दी नियंत्रित करतेवेळी तेलंगणातील पोलिसांना समजलं असतं आणि दुर्घटना घडली नसती, असं काँग्रेसच्या वतीने सांगण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं?

राहुल गांधी यांना पाहण्यासाठी रस्त्यावर लोकांनी प्रचंड गर्दी होती. गर्दीवर नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यावेळी तेलंगणातील एका एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने नितीन राऊत यांना जोरात ढकलले. नितीन राऊत यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता ठिक आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर ते कन्याकुमारी निघालेली भारत जोडो यात्रेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या 5 राज्यातून आतापर्यंत 53 दिवस ही पदयात्रा सुरू आहे. महाराष्ट्रात 7 नोव्हेंबरला या पदयात्रेचा प्रवेश होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण बंदी, भाजप आमदाराच्या शाळेत अजब फतवा

Team India Squad : टी २० मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; गंभीरचा सर्वात विश्वासू खेळाडू बाहेर, 'विदर्भ एक्स्प्रेस'ची संघात एन्ट्री

एक-दोन दिवसात कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; जरांगेंच्या मागण्यांवर जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नियमच सांगितला

Maharashtra News Live Update: माधुरी हत्तीनी गुजरातमधील वनतारामधून कोल्हापूरच्या दिशेने रवाना

Nanded Accident: नांदेडमध्ये ट्रक - व्हॅनचा भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, ट्रकचालक केबिनमध्ये अडकला

SCROLL FOR NEXT