ACP Nitin Bobde Death News  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News : सहायक पोलीस आयुक्तांचा ऑफिसमध्येच मृत्यू, जेवणानंतर विश्रांती घेत असताना दुर्दैवी घटना

ACP Nitin Bobde Death: नितीन बोबडे यांनी दुपारी जेवण केल्यानंतर विश्रांती घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> सचिन गाड

ACP Nitin Bobde Death News : येलो गेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन बोबडे यांचं निधन झालं आहे. ते ५५ वर्षांचे होते. बोबडे कार्यालयात असतानाच दुपारी दोन ते चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नितीन बोबडे सकाळी १० च्या सुमारास कर्तव्यावर हजर झाले होते. दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान बोबडे यांनी जेवणं केलं आणि त्यानंतर आपल्या कक्षात विश्रांती घेत होते.

दरम्यान पावणे चारच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी दार वाजवल्यानंतर त्यांनी आतून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांनी आत जाऊन पाहिले तेव्हा बोबडे कोणतीही प्रतिक्रिया देत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. (Latest Marathi News)

यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीच प्रयत्न केले मात्र त्यांना वाचवण्यात पोलिसांना यश आले नाही. सध्या सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन सुरू आहे. त्यांच्या मृत्यूने पोलिस खात्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Mumbai News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT