Nitesh Rane Tweet Saam Tv
मुंबई/पुणे

Nitesh Rane: 'वक्त वक्त की बात हैं...', राहुल कनाल IT धाड प्रकरणी नितेश राणेंचं खोचक ट्विट

युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई: शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचं आयकर विभागाने दार ठोठावलं आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली आहे. त्यावर, भाजप आमदार नितेश राणे यांनीही या प्रकरणावरुन शिवसेनेला सुनावलं आहे (Nitesh Rane Tweet On Rahul Kanal IT Raid And Criticize Shivsena).

"वक्त वक्त की बात हैं"

"राहुल कनालच्या घरी आयकर विभागाची धाड. अजून काढा आमच्या अधिशवर मोर्चा. बोललो होतो ना... वक्त वक्त की बात हैं...", अशा आशयाचं ट्विट करत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.(Nitesh Rane Tweet)

राहुल कनालच्या घरी आयकर विभागाची धाड

आज सकाळीच आयकर विभागाचे (Income Tax Department) एक पथक कनाल यांच्या घरी पोहोचले. त्यांनी छापेमारीला सुरुवात केली. यावेळी त्यांच्या घराबाहेर केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या परिसरातील नाईन अल्मेडा इमारतीतील कनाल यांच्या घरी आले आणि त्यांनी घराची झाडाझडती सुरू केली आहे. राहुल कनाल हे आदित्य ठाकरेंचे (Aaditya Thackeray) निकटवर्तीय मानले जातात.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG ships : मोठी बातमी! नागपूरची २ जहाजे इराणच्या हॉर्मुझमध्ये अडकली, केंद्र सरकारनं दिले महत्त्वाचे आदेश

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Vicky Kaushal : विकी कौशलने व्यक्त केली मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा, आवडता दिग्दर्शकही सांगितला

Henna Side Effects : केसांना मेहंदी लावताय? मग थांबा 'हे' नुकसान आधी जाणून घ्या

Original Paithani Saree: गुढीपाडव्याला नेसण्यासाठी ओरिजनल पैठणी साडी कशी ओळखायची?

SCROLL FOR NEXT