Disha Salian: 'दिशा सालियन आत्महत्या प्रकरणावर बोलू नका; असं राऊतांनी महापौरांना सांगितलं' Saam TV
मुंबई/पुणे

Disha Salian : 'दिशा सालियन आत्महत्या प्रकरणावर बोलू नका; असं राऊतांनी महापौरांना सांगितलं'

राज ठाकरेंची शिवसेनेमधील घोडदौड थांबवण्यासाठी, रमेश किणी प्रकरणातल्या बातम्या बाहेर काढल्या

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : दिशा सालियनच्या (Disha Salian) आत्महत्येवरुन सध्या राज्यात राजकारण सुरु आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत नारायन राणेंनी दिशा सालियनची बदनामी केल्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे आणि यावरुनच आता नितेश राणेंनी (Nitesh Rane) महापौरांवर टीका केली आहे.

नितेश राणे म्हणाले, 'एका पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी (Sanjay Raut) महापौर किशोरी पेडणेकरांना ठणकावून सांगितलं की 'यापुढे दिशा सलियनच्या प्रकरणावर बोलू नका' पण त्यावर त्या थांबल्या नाहीत, किशोरीताईंनी काल महिला आयोगाला पत्र लिहिलं आणि काल त्या दिशा सालियन कुटुंबियांना भेटल्याही

याच महापौरांनी (Mayor) काही महिन्यांपूर्वी त्यांचाच युवराजना पेंग्विन म्हणतात याची घोषणा करून टाकली महापौरांचाहाच उत्साह , कदाचित आदित्य ठाकरे यांनी छुपी घोषणा केली, ४५ वर्षावरील लोकांना नेत्यांना उमेदवारी नाही , हे त्यामुळेच तर नाही ना ? असा सवालही राणे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, दिशा सालीयन प्रकरणात राजकारण शिवसेनेच्या अंतर्गत सत्ता संघर्षामुळे आहे. शिवाय रमेश किणी प्रकरण राज ठाकरेंची (Raj Thackeray) शिवसेनेमधील घोडदौड थांबवण्यासाठी त्या प्रकरणातल्या बातम्या बाहेर काढण्यात आल्या आणि त्याप्रमाणेच आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेला थांबवण्यासाठी हे होत असताना दिसतंय असं म्हणतच राणे म्हणाले स्वार्थासाठी का होईना दिशा सालीयनला न्याय मिळवून देण्यासाठी महापौर ताईंनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे आभार, असही ते म्हणाले,

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Rule Change : आरबीआयनं नियम बदलले, ऑटो-पेमेंटची ती अट कायमची बंद, वाचा सविस्तर

FIR against minister: गृहमंत्र्यांवर FIR दाखल करा, कोर्टाचे आदेश; कबड्डी सामन्यात लावली होती ५०० रुपयांची पैज

Health Care: सतत थकवा, अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होतोय? मग शरीरात असू शकते ‘ही’ कमतरता; वेळीच व्हा सावधान

Badlapur News: नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा; राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये हमरीतुमरी

Maharashtra News Live Update: नारा नदी पुलाखाली आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह

SCROLL FOR NEXT