Western Railway Megablock Saam tv
मुंबई/पुणे

Western Railway: पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक, प्रवाशांचे मेगा हाल! दादर, अंधेरीसह प्रत्येक स्टेशनवर गर्दी

Wetern Railway Mega Block: 24 जानेवारीच्या रात्री पश्चिम रेल्वेने देखभालीच्या महत्त्वाच्या कामांसाठी ब्लॉक घेतल्याने रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला, तर काही गाड्या उशिराने धावत होत्या.

Dhanshri Shintre

माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान पुलाच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने २४-२५ व २५-२६ जानेवारीला रात्री 11 ते सकाळी 8.30 वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेतला आहे. या कालावधीत 275 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

1888 मध्ये बांधलेला लोखंडी स्क्रू पाइल रेल्वे पूल काँक्रीटच्या खांबांनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी पश्चिम रेल्वेने २४ व २५ जानेवारीच्या रात्री ११.०० ते सकाळी ८.३० या वेळेत विशेष ब्लॉक घोषित केला आहे. या कामामुळे अनेक लोकल गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना सकाळच्या वेळी प्रवासात अडथळ्यांचा सामना करावा लागला. प्रवाशांनी यामुळे होणाऱ्या गैरसोयीचा विचार करून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी आणि बोरिवली या महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. सहा महत्त्वाच्या स्थानकांवर धीम्या लोकल थांबत नसल्याने प्रवाशांचा संताप वाढला. चर्चगेट ते दादर जलद मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू होती, तर विरार ते अंधेरी दरम्यान काही लोकल चालू होत्या. मात्र, अंधेरीहून पुढे लोकल उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे हाल झाले. सकाळी ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागला. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ७.३० नंतर रेल्वे वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल सेवेवर दररोज लाखो प्रवासी अवलंबून आहेत. पश्चिम रेल्वेने देखभालीसाठी २४ जानेवारीच्या रात्री विशेष ब्लॉक घेतल्याने रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. पश्चिम रेल्वे मार्गावरील काही गाड्या अद्यापही काही मिनिटे उशिराने धावत आहेत. रेल्वे प्रशासनाने कामे लवकर पूर्ण करून सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन सावधगिरीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीआधीच तुकाराम मुंढेंचा धमाका, भेसळखोरांवर धडक कारवाई; कोट्यवधींचं तेल, भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त

निवडणुकीत गडबड झाली तर याद राखा; SIRच्या वादादरम्यान सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला फटकारलं

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हरियाणातून आणखी दोन आरोपी ताब्यात

मोठी बातमी! राज्यातील २५ सरकारी विद्यालयांची नावे बदलली; तुमच्या परिसरातील शाळेचे नाव काय झाले? पाहा यादी

Maharashtra News Live Update: देवी विसर्जनात ध्वनिप्रदूषणाचा मर्यादा ओलांडली, न्यायलयाच्या निर्णयाचंही उल्लंघन, आवाज फाउंडेशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT