Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

कोल्हापूर उत्तरच्या नवनिर्वाचित आमदार जयश्री जाधवांना अजित पवारांनी दिला कानमंत्र

कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधव यांनी मंत्रालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची सदिच्छा भेट घेतली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे -

मुंबई : कोल्हापूर उत्तरच्या जनतेने तुमच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी चांगले काम करा, महाविकास आघाडीचे सरकार तुमच्यासोबत आहे, असा विश्वास देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर उत्तरच्या नवनिर्वाचित आमदार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांचे अभिनंदन केले.

कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधव यांनी मंत्रालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते.

हे देखील पाहा -

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार (Kolhapur North By-Election) संघांच्या विकासासाठी तसेच सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी चांगले काम करा. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही देत नवनिर्वाचीत आमदार जयश्रीताई जाधव यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

Pune : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Brain improvement exercises: फोकस आणि स्मरणशक्ती वाढवायचीये? डॉक्टरांनी सांगितले मेंदूचे 3 सोपे व्यायाम, आजपासूनच करून पाहा

Kitchen Hacks : भाजीत मीठ जास्त झालंय? करा 'हा' रामबाण उपाय, चवीला लागेल बेस्ट

Beed News: बैल नसल्याने जु खांद्यावर घेऊन शेतकऱ्याने केली कोळपणी, लातूरनंतर बीडमधील शेतकऱ्याचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT