Covid Update: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवाशांवर कठोर निर्बंध, सुधारित गाईडलाईन्स जारी Saam tv news
मुंबई/पुणे

New guidelines: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवाशांवर कठोर निर्बंध, सुधारित गाईडलाईन्स जारी

कोविड (Corona) बाधित असल्यास प्रवाश्याला नियमित RTPCR घेण्यास सांगितले जाणार आहे

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - महानगर पालिकेकडून (Mumbai Municipal Corporation)आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी अलीकडील सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जोखीम असलेल्या आणि उच्च जोखमीच्या देशांमधून आणि UAE मधून येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना रॅपिड RTPCR चाचणी करणं सक्तीचं करण्यात आले आहे. कोविड (Corona) बाधित असल्यास प्रवाश्याला नियमित RTPCR घेण्यास सांगितले जाणार आहे आणि अहवालाची प्रतीक्षा करण्यास सांगितलं जाईल. (New guidelines for Airport from Municipal Corporation)

अहवाल निगेटिव्ह आल्यास पुढील ७ दिवस गृह विलगिकरणात राहण्यास सांगितलं जाईल. आरटीपीसीआर चाचणीत अहवाल पोजिटिव्ह असल्यास त्या प्रवाश्याला लक्षणे असतील तर पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात ठेवलं जाणार आहे किंवा प्रवाश्याला पैसे भरून खासगी रुग्णालयात जायचं असल्यास बॉम्बे हॉस्पिटल/ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये उपचार घेता येतील.

तसेच लक्षणे नसलेले प्रवाशी पालिकेच्या बीकेसी जम्बो कोविड केंद्र किंवा कांजूर जंबो कोविड केंद्रात ठेवलं जाणार आहे किंवा प्रवाश्याला खासगीत पैसे भरून राहायचं असल्यास पालिकेने सूचीबद्ध केलेल्या हॉटेलच्या पसंतीचे खाजगी हॉटेलात प्रवाश्याला राहता येणार आहे.

अशा देशांची यादी जिथून प्रवाशांना भारतात आगमन झाल्यावर अतिरिक्त उपायांचे पालन करावे लागेल

युनायटेड किंगडमसह युरोपमधील देश

दक्षिण आफ्रिका

ब्राझील

बोत्सवाना

चीन

घाना

मॉरिशस

न्युझीलँड

झिंबाब्वे

टांझानिया

हाँगकाँग

इस्रायल

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ठाण्यात राष्ट्रवादीकडून इफ्तार पार्टीचे आयोजन

Lawrence Bishnoi Gang Threat: 'अगली बार सीधे माथे में गोली मारेंगे'…; गायक बादशाहला जीवे मारण्याची धमकी

Georgette Silk Saree Type: लग्न ते पार्टीसाठी ट्राय करा या ७ सुंदर, ट्रेंडी आणि युनिक जॉर्जेट सिल्क साडी डिझाइन्स

Sunday Horoscope: पैशाचे व्यवहार पुढे ढकला, ५ राशींचा दिवस आनंदात जाणार; वाचा रविवारचे राशी

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; सिनेसृष्टी बुडाली शोकसागरात

SCROLL FOR NEXT