Kirit Somaiya And Neil Somaiya Saam Tv
मुंबई/पुणे

Neil Somaiya: किरीट सोमय्यांचा मुलगा नील याला हायकोर्टाचा मोठा दिलासा

सेव्ह आयएनएस विक्रांत मदतनिधी प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील याला मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला आहे.

Nandkumar Joshi

मुंबई: 'सेव्ह आयएनएस विक्रांत' मदतनिधी घोटाळा प्रकरणात अडचणीत सापडलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील याला मुंबई हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणात कोणतीही कठोर कारवाई करण्यात येऊ नये, असे निर्देश कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. तसेच पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीला हजर राहून तपासात सहकार्य करण्याचे आदेश कोर्टाने नील सोमय्याला दिले आहेत.

सेव्ह आयएनएस विक्रांत मदतनिधी प्रकरणात अपहार झाल्याचा किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर आरोप आहे. यामुळे सोमय्या पिता-पुत्र अडचणीत सापडले आहेत. किरीट सोमय्या यांच्यानंतर आता मुंबई हायकोर्टानं त्यांचा मुलगा नील यालाही दिलासा दिला आहे. नील सोमय्याला मुंबई उच्च न्यायालयानं अंतरिम दिलासा दिला आहे. अटक झाली तर, नीलची ५० हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत. दरम्यान, २५ ते २८ एप्रिल या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत नीलला तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT