Nilam gorhe SaamTV
मुंबई/पुणे

"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राणेंच्या 'प्रहार' मधील फक्त 'हार' शिल्लक"

मुंबई महापालिका निवडणुकीत नारायण राणेंमुळे सेनेचा कसलाही तोटा होणार नाही.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे : उद्धव ठाकरेंच्या Uddhav Thackeray दसरा मेळाव्यातील भाषणाला भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांनी प्रहारमधून उत्तर दिलं आहे. शिवसेना आणि राणे हा वाद नवा नसला तरी तो नेहमी नव्याने वेगवेगळ्या कारणांवरुन होताना दिसतो अशातच आता राणेंनी त्यांच्या दैनिक प्रहार Prahar मधून थेट आव्हानच मुख्यमंत्र्यांना आणि शिवसेनेला दिलं आहे. (Neelam Gorhe criticized on Narayan Rane)

'हार आणि प्रहार' या मथळ्याखाली लिहलेल्या या प्रहारमधील लेखाने नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे आणि यावरुनच आता सेना नेते देखील राणेंवरती टीका करत आहेत. 'प्रहारमधील 'प्र' हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर निघून गेला असून आता केवळ 'हार' शिल्लक आहे.' अशा शब्दांत डॉ. नीलम गोऱ्हे Nilam Gorhe यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर निशाणा साधला. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीत नारायण राणेंमुळे सेनेचा कसलाही तोटा होणार नाही असंही त्या म्हणाल्या. राणे यांनी समतोल राखून बोलावं इसा इशारा देखील गोऱ्हे यांनी दिला.

तर लाचार हा शब्द ज्यांना लागू होतो, ती‌ व्यक्ती म्हणजे नारायण राणे. सत्तेसाठी स्वार्थासाठी लाचारी म्हणजे राणे अशी जहरी टीकाही शिवसेना खासदार विनायक राऊत Vinayak Raut यांनी राणेंवरती केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT