Abdul Sattar Latest News saam tv
मुंबई/पुणे

Abdul Sattar Controversy : ...तर मुख्यमंत्री शिंदेंना मंत्रालयात बसून देणार नाही ; शिवीगाळ प्रकरणानंतर विद्या चव्हाण आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या विद्या चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रालयात बसून देणार नाही असा इशारा दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Abdul Sattar Latest News: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे विरोधकांना शिवीगाळ केल्यामुळे चर्चेत आले आहेत. सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यामुळे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ शब्द वापरल्यानंतर मंत्री सत्तार यांनी घुमजाव केला आहे. मात्र,सत्तारांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या विद्या चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रालयात बसून देणार नाही असा इशारा दिला आहे.

विद्या चव्हाण म्हणाल्या, 'अब्दुल सत्तारांनी माफी मागून चालणार नाही. अब्दुल सत्तारांचे हे पहिलं प्रकरण नाही. अब्दुल सत्तारांनी तोंड सांभाळून बोललं पाहिजे. कोणाविषयी बोलतोय हे बघितले पाहिजे. सुसंस्कृत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात असं विधान करणं आम्हाला अजिबात मान्य नाही. गुलाबराव पाटील देखील असंच बोलले आहे. तर मंत्री रविंद्र चव्हाण हे बलात्कार प्रकरणातील आरोपीला वाचविण्यासाठी पोलीस स्टेशनात जाऊन बसले आहेत. हे सर्व महिला विरोधी मंत्री आहेत'.

'शिंदे सरकारमधील तिन्ही मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रालयात बसू देणार नाही. शिंदे सरकार हे घटनाबाह्य सरकार आहे. मुख्यमंत्र्यांनी या तिघांचा राजीनामा घेतला नाही, तर आम्ही यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा चव्हाण यांनी दिला.

'मुख्यमंत्र्यांनी त्यांचा उद्यापर्यंत राजीनामा घेतला पाहिजे. सत्तारांच्या माफीवर विश्वास नाही. सत्तार, तुम्ही फुले-शाहु-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतात. सुळेंचा अपमान म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा अपमान आहे. आम्ही हा अपमान सहन करणार नाही. त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे', असेही चव्हाण पुढे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT