PMC : BJP च्या 5 वर्षाच्या कारभाराबाबत राष्ट्रवादी देणार थेट ACB कडे निवेदन Saam TV
मुंबई/पुणे

PMC : BJP च्या 5 वर्षाच्या कारभाराबाबत राष्ट्रवादी देणार थेट ACB कडे निवेदन

'मागील पाच वर्षात BJP ने शहराच्या विकासाला गती दिली आहे. आधीच्या सत्ताधाऱ्यांना ते जमलं नाही म्हणून त्यांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली आहे.'

अश्विनी जाधव केदारे साम टीव्ही पुणे

पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलीय आहे. पुणे महापालिकेतील भाजपच्या (BJP) पाच वर्षांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) केली आहे.

पुण्यामध्ये गेल्या केवळ सहा महिन्यात 11 हजार 50 कोटींचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. सत्ताधारी भाजपचा संपूर्ण कारभार संशयास्पद असून यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवेदन देण्यात येणार आहे.

सत्ताधारी भाजपने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. मागील पाच वर्षात भारतीय जनता पक्षाने शहराच्या विकासाला गती दिली आहे. आधीच्या सत्ताधाऱ्यांना ते जमलं नाही म्हणून आज त्यांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या हिताचे प्रकल्प हाती घेऊन ते पूर्णत्वाला येणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. आरोप प्रत्यारोप होत असले तरी राज्यात चाललेल्या भ्रष्टाचाराचं लोण आता पालिका पातळीवर पोहचायला सुरवात झालीय हे मात्र नक्की

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

RBI Repo Rate : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने घेतला 'हा' निर्णय; तुमचा EMI कमी होणार की वाढणार?

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT