Jayant Patil News  Saam Tv
मुंबई/पुणे

Jayant Patil News: तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' कणखर भूमिकेला राष्ट्रवादीचा पाठिंबा'; जयंत पाटील यांचं ट्विट चर्चेत

तमिळनाडूतही राज्यपाल विरुद्ध सरकार असा संघर्ष सुरू झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Jayant Patil News : तमिळनाडूतही राज्यपाल विरुद्ध सरकार असा संघर्ष सुरू झाला आहे. तमिळनाडूच्या विधानभवनात राज्यापालांचे अभिभाषण थांबवून तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी आक्षेप नोंदवला. तसेच सरकारचे भाषणच पटलावर गेले पाहिजे, असं म्हणत राज्यपालांच्या विरोधात प्रस्ताव संमत केला. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. (Latest Marathi News)

तामिळनाडूच्या विधानभवनात राज्यपाल आरएन रवी यांनी आपल्या अभिभाषणातून 'द्रविड मॉडल', 'पेरियार', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर', 'धर्मनिपेक्षता' शब्द वगळून राज्यपालांनी भाषण केले. त्यामुळे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी आक्षेप नोंदवला. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या विरोधात प्रस्ताव संमत केला. या भूमिकेची महाराष्ट्रात सुरू झाली आहे. एमके स्टॅलिन यांच्या या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत पाठिंबा दिला आहे.

जयंत पाटील ट्विट करत म्हणाले, 'भारत हा राज्यांचा समूह असून संघराज्यीय व्यवस्थेत राज्यांना केंद्राच्या बरोबरीचाच दर्जा असतो. मात्र केंद्र नियुक्त राज्यपालांच्या कडून राज्यांच्या घटनात्मक अधिकारांवर गदा आणण्याचे काम देशभर सुरु आहे'.

'राज्यपालांचे अभिभाषण हा संबंधित सरकारच्या धोरणांचा दस्तऐवज असतो. मंत्रिमंडळाने मान्यता दिलेले भाषण राज्यपालांना वाचावे लागते. संविधान अस्तित्वात आल्यापासून ही प्रथा चालू आहे, असे जयंत पाटील पुढे म्हणाले.

'मात्र, तामिळनाडूच्या राज्यपाल महोदयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह पेरियार यांच्याही नावाचा भाषणातून उल्लेख वगळला. राज्यपालांचे हे कृत्य कायदेशीर व नैतिकदृष्ट्याही अयोग्यच आहे. भाजपाच्या मुशीतून आलेल्या लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांच्या नावाची ऍलर्जी आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे, असे जयंत पाटील यांनी ट्विट करत जाहीर केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT