मुंबई/पुणे

Dasara Melava 2022 : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी राष्ट्रवादीची बॅनरबाजी; 'मातोश्री'बाहेर लक्षवेधी बॅनर

राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शुभेच्छा देण्यासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेना (Shivsena) आणि दसरा मेळावा हे अनोखं नातं अवघ्या महाराष्ट्रानं गेली अनेक वर्षांपासून जनतेनं पाहिलं आहे. मात्र यंदाचा दसरा मेळावा दोन गटात विभागला आहे. दसरा मेळाव्यात ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने दिसणार आहे. उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळाव शिवाजी पार्कमध्ये तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये पार पडणार आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतरही महाविकास आघाडीत राहण्याची आपली भूमिका काय ठेवली आहे. म्हणून आता उद्धव ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून दसरा मेळाव्यातही समर्थन मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मैदानात उतरला आहे, असं चित्र पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

मातोश्रीबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा बॅनर शेजारीच राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शुभेच्छा देण्यासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनरवर एक संघटना, एक विचार, एकच मैदान.. शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरा अखंड राहू द्या. खूप खूप शुभेच्छा असा उल्लेख आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Maharashtra politic : ६ खासदार फुटल्यानंतर ठाकरेंना आणखी धक्का, अंबादास दानवे महायुतीच्या गोटात, राजकारणात खळबळ

Sambhajinagar : प्ले स्कूलमधील निष्काळजीपणाचा कळस! २३ महिन्यांच्या चिमुकल्याला गंभीर दुखापत, ६ जणांविरोधात गुन्हा

Skin Infection : पावसाळ्यात होऊ शकतं फंगल इन्फेक्शन, सुरुवातीची ही ७ लक्षण ओळखा नाहीतर...

Actor Death : तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ हरहुन्नरी अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोकसागरात

SCROLL FOR NEXT