मुंबई/पुणे

NCP Notice to 12 Mla : शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी मारणारे १२ आमदार अडचणीत, पक्षाने उचललं मोठं पाऊल

NCP Political News : पक्षाचे मुख्य व्हीप जितेंद्र आव्हाड यांनी ही नोटीस बजावली आहे.

Rashmi Puranik

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही बाजूने एकमेकांवर कारवाई सुरु झाली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट पक्ष आपल्याकडे असल्याचा दावा करत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार गट) १२ आमदारांना करणे दाखवा नोटीस बजावली आहे.

५ जुलै पक्षाचा बैठकीला अनुपस्थित राहून पक्षविरोधी कारवाई केली म्हणून या आमदारांना ही नोटीस पाठवली आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी ४८ तासाचा अवधी देण्यात आला आहे. पक्षाचे मुख्य व्हीप जितेंद्र आव्हाड यांनी ही नोटीस बजावली आहे. (Tajya Marathi Batmya)

काय म्हटलंय नोटीसमध्ये?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्य व्हीप म्हणून, 5 जुलै 2023 रोजी यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉइंट मुंबई येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यांना आमंत्रित केले होते. या बैठकीला सर्व निमंत्रितांनी उपस्थित राहणे बंधनकारक होते, असा व्हीप होता. (Latest Political News)

मात्र काही आमदार पक्षाच्या निर्देशाचे आणि व्हीपचे उल्लंघन करून या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी होण्याच्या तुमच्या वर्तनाबद्दल तुम्हाला 48 तासांच्या आत उत्तर देण्याची संधी दिली जात आहे. उत्तर न दिल्यास योग्य कारवाई सुरू केली जाईल. (Latest Marathi News)

कोणत्या आमदारांना नोटीस बजावली?

  1. सुनील शेळके

  2. दिलीप बनकर

  3. नितीन पवार

  4. दीपक प्रल्हाद चव्हाण

  5. इंद्रनील नाईक

  6. यशवंत माने

  7. शेखर निकम

  8. राजू कारेमोरे

  9. मनोहर चंद्रिकापुरे

  10. संग्राम जगताप

  11. राजेश पाटील

  12. माणिकराव कोकाटे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Facts : सापांना कान नाहीत, मग ते आवाज कसे ऐकतात? ९९ टक्के लोकांना याबद्दल माहिती नाही

Kidney Health: किडनी खराब होऊ नये म्हणून जीवनशैलीत आजच करा हे 7 महत्त्वाचे बदल

पावसाळ्यात खा गावरान स्टाईल दिंड्याची भाजी; घरी बनवण्याची रेसिपी एकदम सोपी

Koel Mallick Resign : ३ महिन्यांपूर्वीच शपथ, आता राज्यसभा खासदारकीचा राजीनामा; माजी मुख्यमंत्र्यांना जोरदार झटका

crime : भूलतज्ज्ञाची अपार्टमेंटमध्येच निर्घृण हत्या, ८ वर्षांचा मुलगाही गंभीर जखमी; डॉक्टर पत्नीच्या कृत्याने खळबळ

SCROLL FOR NEXT