supriya sule saam tv
मुंबई/पुणे

Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट; पुण्यात कार्यक्रमादरम्यान घडली घटना

खासदार सुप्रिया सुळे पुण्यात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. यावेळी दिप प्रज्वलन करताना ही घटना घडली आहे.

Gangappa Pujari

ज्ञानेश्वर हिंगोलीकर, पुणे

Pune: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागल्याची मोठी बातमी समोर येत आहे. कार्यक्रमात दिप प्रज्वलन करताना ही घटना घडली आहे. आग लागल्यानंतर तात्काळ विजवली असून यामध्ये सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही. (Pune News)

याबाबत अधिक माहिती अशी की, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) पुण्यातील हिंजवडीत कराटे प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमात दिपप्रज्ज्वलन केल्यानंतर छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालताना खा. सुळे यांच्या साडीने पेट घेतला. साडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखत आग विझवण्यात आली. सकाळी साडे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

दरम्यान, या घटनेत सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झाली नसून त्यांचे दैनंदिन कार्यक्रम ठरल्यानुसार सुरू राहणार आहेत. हा कार्यक्रम संपवून त्या बावधनमधील कार्यक्रमालाही गेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : बौद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात मोठी अपडेट; श्रीकांत शिंदेंनी KDMC आणि MMRDA ला दिले सखोल चौकशीचे आदेश

कर्जमाफीच्या अटी, शेतकऱ्यांसाठी कटकटी; केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी?

'मोदींचे सरकार जाणार, आणीबाणी येणार'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Fact Check: शाहरूख खान कॉकरोच जनता पार्टीत जाणार? लवकरच पार्टी जॉईन करण्याची घोषणा?

फुले दिले की फुलेच मिळतात, कुणी टीका केली, तरी शांत राहायचं; जॅकी श्रॉफ असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT