Rohit Pawar Saam tv
मुंबई/पुणे

Rohit Pawar: 'आपली लढाई सुरुच राहणार'; ११ तासांच्या ईडी चौकशीनंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Rohit Pawar reaction on ed inquiry : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणात ईडी अधिकाऱ्यांनी चौकशी केली. ईडी अधिकाऱ्यांकडून तब्बल ११ तास चौकशी केली.

Vishal Gangurde

Rohit Pawar reaction on ed inquiry :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणात आज बुधवारी ईडी अधिकाऱ्यांनी चौकशी केली. ईडी अधिकाऱ्यांकडून तब्बल ११ तास चौकशी केली. ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर रोहित पवारांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. रोहित पवारांनी ईडी चौकशी झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. ' आपली लढाई सुरुच राहणार, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

रोहित पवार हे ईडी कार्यालयातून तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तसेच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्या. तसेच कार्यकर्त्यांनी फटाके वाजून रोहित पवार यांचे स्वागत केले. रोहित पवार हे कार्यालयाच्या बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. यावेळी कार्यकर्त्यांसहित खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, आमदार संदिप क्षिरसागर उपस्थित होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रोहित पवार म्हणाले, 'आपली लढाई सुरुच राहणार आहे. मी मनापासून सर्वांचं आणि शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेसमोर झुकायला हरकत नाही. पण काही झालं तरी त्यांच्यासमोर झुकणार नाही'.

'शरद पवारसाहेब लढत आहेत. ८४ वर्षांचा योद्धा लढतोय. मी ईडी अधिकाऱ्यांना सहकार्य करणार , त्यांनी जे काही मागितलं ते त्यांना दिलं. आपण एकजुटीने लढत आहोत. इथे अनेक लोक घाबरतात. पण कार्यकर्त्यांचा आवाज पोहोचत होता. तुम्ही लढत होता, त्यातून प्रेरणा घेत होतो. साहेबांना लढणारी माणसं आवडतात, असे रोहित पवार म्हणाले.

'कार्यकर्ता अडचणीत असताना पवारसाहेब १० तास बसले होते. यावरून पवार साहेब युवकांना संधी देतात. बाप माणूस म्हणून पाठी उभे राहतात, पण पळणाऱ्यांच्या पाठी नाही. लढणाऱ्याच्या पाठी राहतात, असे ते म्हणाले.

'हा मार्ग संघर्षाचा आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढायचं आहे. १ फेब्रुवारीला परत बोलावले आहे. स्वाभिमानी कार्यकर्त्यांसमोर बोट केले, तर आम्ही त्याचं उत्तर लोकशाही पद्धतीने देणार. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही आणि झुकणार नाही. लढायचं आहे, ते पण जिंकण्यासाठी लढायचं आहे, असेही ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT