supriya sule  saam tv
मुंबई/पुणे

'मुंबई-पुण्यासह महाराष्ट्राचं...'; 'वेदांता' प्रकल्पावरून सुप्रिया सुळे यांनी केली शिंदे सरकारवर टीका

'वेदांता' प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Supriya Sule News : महाराष्ट्रात येणारा वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातला गेल्यावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. राज्यात दोन लाख कोटींची गुंतवणूक असणारा आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा हा महत्वपूर्ण 'वेदांता' ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात येणार आहे. 'वेदांता' प्रकल्पावरून राज्यात नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. याच 'वेदांता' प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजपासून दोन दिवस तृतीयपंथीयांची राज्यस्तरीय परिषद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ एकाच व्यासपीठावर होत्या. या कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सुळे यांनी 'वेदांता' प्रकल्पावरून शिंदे सरकारवर निशाणा साधला.

'अतिशय दुर्दैव आहे. महाराष्ट्र मेरिटमध्ये पास झाला. परंतु गुजरातच्या निवडणुका पाहून हा वेदांत प्रकल्प गुजरातला गेला. यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान होणार आहे. अडीच तीन लाख नोकऱ्या जातील. जीएसटी रक्कम यामध्ये मोठी आहे. यामधील ३० हजार कोटी जीएसटी मिळणार आहे. त्यात ५०-५० टक्के राज्य आणि केंद्राला मिळणार आहे. ते सामाजिक विकासासाठी वापरता येणार आहेत', असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

'मुंबई-पुण्यासह महाराष्ट्राचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे. सगळ्या पक्षानी एकत्रित येऊन काम केलं पाहीजे. महाविकास आघाडीमध्ये यातील काही लोक होते. महाराष्ट्र कधीच विसरणार नाही की साडे सात वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सत्तेत होते. मुख्यमंत्री कॅबिनेट करायच्या वेळी सात वेळा दिल्लीला जाऊन आले. त्यामुळं आता तातडीने जावं आणि महाराष्ट्राची बाजू दिल्लीत मांडली पाहिजे. दुसरी ऑफर काही नसते. पंतप्रधान मेरिट बघतात. महाराष्ट्र पास झाला, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे',असेही त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी मुक्कामी आल्यानंतर शेतात रमले

Salim Khan: सलमान खानचे वडिल सलीम खान यांच्यावर केली डीएसए प्रक्रिया; नक्की काय आहे ही प्रोसेस आणि का करतात?

Elvish Yadav-Engaged 2 : महिलेचा टी-शर्ट काढला, आंघोळ घातली अन्...; एल्विश यादवच्या शोमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEOS पाहून नेटकरी भडकले

Latur Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी! धाकट्या भावनेचं काढला थोरल्या भावाचा काटा; कारण ऐकून व्हाल थक्क

Accident : भीषण अपघात! ट्रेलरची PCR गाडीला धडक, ५ पोलिसांचा जागीच मृत्यू, ३ जखमी

SCROLL FOR NEXT