anil deshmukh  saam tv
मुंबई/पुणे

Anil Deshmukh: अनिल देशमुख आर्थर रोड तुरुंगात चक्कर येऊन पडले, जे जे रुग्णालयात दाखल

मनी लाँड्रिग प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे तुरुंगात अचानक चक्कर येऊन पडल्याची माहिती समोर येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

Anil Deshmukh News : मनी लाँड्रिग प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे तुरुंगात अचानक चक्कर येऊन पडल्याची माहिती समोर येत आहे. चक्कर आल्यानंतर त्यांच्या छातीत दुखत असल्याने व त्रास्त जास्त असल्याने त्यांना तातडीने जे. जे. रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अनिल देशमुख हे गेल्या दहा महिन्यांपासून तुरुंगात बंदिस्त आहेत. सध्या ते ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. अनेक दिवसांपासून देशमुख यांची तब्येत ठीक नाही. त्यानंतर आज अनिल देशमुख ऑर्थर रोड तुरुंगात चक्कर येऊन पडले. त्यांना आज छातीत दुखत असल्याने त्यांना तुरुंग प्रशासनाने तातडीने जे.जे. रुग्णालयात दाखल केले. देशमुख यांचा रक्तदाब वाढला आहे. तसेच त्यांचा ई.सी.जी देखील असामान्य आला आहे. देशमुख यांच्यावर जे.जे. रुग्णलायात तज्ज्ञ डॉक्टरांचा चमू त्यांची तपासणी करीत आहेत.

दरम्यान, अनिल देशमुख यांना काही दिवसांपूर्वी देखील जे.जे. रुग्णालयाच दाखल केले होते. देशमुख हे तुरुंगात चालताना पडल्याने अनिल देशमुख यांच्या खांद्याला मार लागला होता. त्यामुळं अनिल देशमुख यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी देशमुख यांचा जे.जे. रुग्णालयात दाखल करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी त्यांची प्रकृती खंगल्याची दिसली होती. त्यानंतर आता पुन्हा अनिल देशमुख यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT