Baba Siddique Death Saam tv
मुंबई/पुणे

Baba Siddique Death : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या; मुलाच्या कार्यालयाबाहेर झाला गोळीबार

Baba Siddique Death News: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर त्यांच्यावर गोळीबार झाला.

Vishal Gangurde

मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी हाती आली आहे. अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांचा गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बाबा सिद्धिकी यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आठवड्याभरात अजित पवार गटाच्या दुसऱ्या नेत्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. दोन नेत्याच्या मृत्यूने राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे भायखळा तालुकाअध्यक्ष सचिन कुर्मी यांची हत्या झाली होती. सचिन यांच्या हत्येला आठवडा होत नाही, त्यातच माजी आमदार बाबा सिद्धिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्यावर गोळीबार झाला. वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर येथील राम मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. बाबा सिद्धिकी यांच्या हत्येने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात तीन ते चार जणांनी सिद्धिकी यांच्यावर शनिवारी रात्री ९.१५ च्या सुमारास गोळीबार केला. मुलाच्या कार्यालयाबाहेर असणाऱ्या बाबा सिद्धिकी यांच्या छातीला गोळ्या लागल्या.गोळीबारात जखमी झाल्यावर तातडीने सिद्धिकी यांना लिलावती रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपाचारादरम्यान बाबा सिद्धिकी यांचा मृत्यू झाला.

बाबा सिद्धिकी यांच्या मृत्यूने वांद्रे परिसरात खळबळ उडाली आहे. बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबईत आठवड्याभरात दोन लोक प्रतिनिधींची हत्या झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गोळीबार करणारे दोघे अटकेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींपैकी दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. सध्या दोन्ही आरोपींना खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे. पोलिसांकडून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारत-बांगलादेश सीमेवर गोळीबार; गडचिरोलीच्या BSF जवानाला वीरमरण, देशरक्षणासाठी प्राणांची आहुती

Atul Kulkarni: 'आजच्या परिस्थितीला आम्हीच जबाबदार'; जेन झीच्या आंदोलनाला प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याचा पाठिंबा

Pune Crime: पुण्यात भरदिवसा गोळीबाराचा थरार, पोलिस चौकीसमोर तरुणावर ३ गोळ्या झाडल्या

Maharashtra News Live Update: दादरच्या शिवाजीपार्कात विद्यार्थ्यांचं आंदोलन

Fasting Tips : उपवासाच्या दिवशी किती कप चहा प्यावा? जाणून घ्या योग्य प्रमाण

SCROLL FOR NEXT