Ajit Pawar News  Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar :...तर आज श्रद्धांजली कार्यक्रम झाला असता; अजित पवारांनी सांगितला अपघाताचा 'तो' किस्सा

रुग्णालयात चौथ्या मजल्यावरून त्यांची लिफ्ट खाली आदळल्याची घटना घडल्याची माहिती अजित पवार यांनी दिली

मंगेश कचरे

Ajit Pawar News : विरोधी पक्षनेते अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात काल अजित पवार यांनी हर्डीकर रुग्णालयामध्ये उद्घाटनासाठी हजेरी लावली. या रुग्णालयात चौथ्या मजल्यावरून त्यांची लिफ्ट खाली आदळल्याची घटना घडल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. या घटनेत आज श्रद्धांजली कार्यक्रम झाला असता, असा अपघाताचा किस्सा अजित पवार यांनी सांगितला. (Latest Marathi News)

अजित पवार (Ajit Pawar) हे काल पुण्याच्या दौऱ्यावर होते. आज अजित पवार यांनी बारामतीत तालुक्यातील पवई माळ येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधताना अजित पवार म्हणाले, पुणे येथील हर्डीकर रुग्णालयामध्ये उद्घाटनासाठी लिफ्टने जात असताना चौथ्या मजल्यावर लिफ्ट बंद पडली. त्यानंतर काही क्षणात लिफ्ट चालू होऊन पुन्हा ती खालच्या बाजूला आदळली'.

'या भयानक घटनेनंतर लिफ्टचा दरवाजा तोडून आम्ही बाहेर निघालो. नाहीतर आजचा श्रद्धांजली कार्यक्रम झाला असता. मी ही गोष्ट कोणालाच बोललो नाही अगदी मीडियाला सुद्धा बोललो नाही, असे अजित पवार पुढे म्हणाले.

नाहीतर लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली असती. मात्र, आज तुम्ही घरची माणसे असल्याने मला राहावे ना म्हणून ही गोष्ट तुम्हाला सांगतो हा किस्सा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज बारामती तालुक्यातील पवई माळ येथील जाहीर सभेत सांगितला.

खासदार सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या साडीला आग लागल्याची घटना घडली. कार्यक्रमात दिप प्रज्वलन करताना ही घटना घडली आहे. आग लागल्यानंतर तात्काळ विझविली असून यामध्ये सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही.

खासदार सुप्रिया सुळे पुण्यातील हिंजवडीत कराटे प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमात दिपप्रज्ज्वलन करताना ही घटना घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT