Ajit Pawar Latest News SAAM TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar News: अजित पवार थेट पुण्यात; तब्बल 17 तासांनी 'रिचेबल' झाल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

'पित्ताचा त्रास होत असल्याने घरी आराम करत होतो, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.

साम टिव्ही ब्युरो

Ajit Pawar News: राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार आणि पक्षातील ७ आमदार देखील नॉट रिचेबल असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. त्यामुळे अजित पवार नॉट रिचेबलच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. याचदरम्यान, अजित पवार यांनी पुण्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर नॉट रिचेबलच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

अजित पवार यांनी तब्बल १७ तासांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'पित्ताचा त्रास होत असल्याने घरी आराम करत होतो, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं. (Latest Marathi News)

अजित पवार (Ajit Pawar) सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. एका कार्यक्रमात हजेरी लावल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अजित पवार म्हणाले, मला काल कार्यक्रमाला निघत असताना पित्ताचा त्रास व्हायला सुरू झाला. माझं जागरण आणि दौरे जास्त झाले की मला पित्ताचा त्रास होतो. हा त्रास आताचा नाही, आधीपासून होतो. त्रास सुरू झाल्याने औषधे घेऊन घरी शांतपणे झोपलो'.

'सकाळी प्रसार माध्यमे पाहून मला वाईट वाटलं की, माध्यमे काहीही दाखवत होते. ते बंद करा. सर्वात आधी पुष्टी केली पाहिजे. कारण नसताना एखाद्याची बदनामी करू नका,अशी विनंती अजित पवार यांनी केली.

'आम्ही लोकप्रतिनिधी असल्याने तुम्हाला अधिकार आहे, परंतु आम्ही माणूसचं आहोत. माझी सर्वांना विनंती आहे की, हे बरोबर नाही. वृत्तपत्रात देखील अशाच बातम्या होत्या, असेही अजित पवार पुढे म्हणाले.

शरद पवारांच्या अदानी समूहावरील भूमिकेवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, 'मी शरद पवार यांची मुलाखत हिंदी चॅनलवर पाहिलेली आहे. अखेर पवार साहेब आमचे सर्वोच्च नेते आहेत. पवार साहेब यांनी एखादी भूमिका मांडली तर ती आमची ही भूमिका असते. त्यांची भूमिका तीच आमच्या पक्षाची भूमिका असते. तसेच त्यांची भूमिका म्हणजे आमच्या सर्वांची भूमिका असते'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akhil Akkineni Engagement: नागार्जुनच्या धाकट्या मुलाने गुपचूप उरकला साखरपुडा, कोण आहे भावी सून? पाहा PHOTOS

Grah Gochar: डिसेंबर महिन्यात ७ ग्रह करणार गोचर; 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

Eknath Shinde : मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटेना, केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करणार, एकनाथ शिंदेंना २ ऑफर?

Success Story: सरकारी नोकरी, लंच ब्रेकमध्ये अभ्यास, तिसऱ्या प्रयत्नात UPSC त पहिला; IAS प्रदीप सिंह यांची सक्सेस स्टोरी

Maharashtra News : केंद्राचं महाराष्ट्राला गिफ्ट, २ रेल्वे प्रकल्पांना मंजूरी, शेतकऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT