Ajit Pawar News  Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar :'मुख्यमंत्री जवळच्या आमदारांना खूश ठेवण्यासाठी...'; अजित पवारांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मंगेश कचरे

Ajit Pawar News : राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या जवळच्या आमदारांना खूश ठेवण्यासाठी पॉझिटिव्ह रीमार्क देतात. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करणं अधिकारी वर्गाला जड जाते, असा गंभीर आरोप अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. (Latest Marathi News)

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे आज, रविवारी पुणे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांनी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं. अजित पवार म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे कागदपत्रांची शहानिशा करून मग त्यावर शेरे मारत आहेत. यापूर्वीही महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री होऊन गेले यांनी कधीही असला निर्णय घेतला नाही'.

'परंतु मुख्यमंत्री हे त्यांच्या जवळच्या आमदारांना खुश ठेवण्यासाठी ते पॉझिटिव्ह रीमार्क मारतात. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करणं अधिकारी वर्गाला जड जाते. यातूनच अधिकारी वर्गात देखील थोडंसं नैराश्य आले होते. ते देखील नाराजीने बोलत होते. हे कुठेतरी थांबले पाहिजे मग याला पर्याय काय तर मारलेला रिमार्क संबंधित अधिकाऱ्यांनी तपासून ते व्यवस्थित मुख्यमंत्र्यांना सांगावी मग मुख्यमंत्री त्याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे अजित पवार पुढे म्हणाले.

'वास्तविक असे करण्यापेक्षा सरळ सदरची मागणी तपासून नियमाप्रमाणे कारवाई करावी परत ते बघण्याचं कारणच नाही, उलट यामुळे कागदपत्रांचे फायलिंग वाढत जाणार आहे, असा टोलाही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT