Maharashtra Politics Sharad Pawar Ajit Pawar Supriya Sule  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: अजितदादांच्या आरोपानंतर शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक; आज मोठा गौप्यस्फोट करणार?

Ajit Pawar vs Sharad Pawar: शरद पवार यांनी आज तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, खासदार तसेच पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

Satish Daud

NCP Ajit Pawar vs Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी मोठा गौप्यस्फोट केला. तुम्ही सरकारमध्ये सामील व्हा, मी राजीनामा देतो, असं शरद पवारांनीच आपल्याला सांगितलं होतं. सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्यासमोरच ही चर्चा झाली होती, असा खळबळजनक खुलासा अजित पवार यांनी केला.

अजित पवारांच्या या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, खासदार तसेच पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

पुण्यात दुपारी २ वाजता ही बैठक होणार असून बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थिती राहणार आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या आरोपांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, बैठकीनंतर सायंकाळी ४ वाजता शरद पवार पत्रकारपरिषद घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवार यांनी केलेल्या आरोपांवर आता शरद पवार काय उत्तर देणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अजित पवारांनी काय गौप्यस्फोट केले?

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कर्जमध्ये शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात भाषण करताना अजित पवार यांनी अनेक गौप्यस्फोट केले. तुम्ही सरकारमध्ये सामील व्हा. भाजपसोबत जा मी राजीनामा देतो, असं शरद पवार यांनीच म्हटलं होतं, असा गोप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे.

भाजपसोबत जाण्याचा निर्णय सर्वांबरोबर चर्चा करुन घेतला. चर्चेत सुप्रिया सुळे आणि जयंत पाटीलही होते, असा धक्कादायक गौप्यस्फोटही त्यांनी केला. शरद पवार साहेबांनी आम्हाला गाफिल का ठेवलं असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT