Sharad pawar  Saam Tv
मुंबई/पुणे

एकनाथ शिंदे यांना कोणत्या राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा ? शरद पवार म्हणाले...

बैठक संपल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : एकनाथ शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार (MVA) कोसळणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने मुंबईत पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आयोजित केली. ही बैठक संपल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. ( Sharad Pawar Latest News In Marathi )

शरद पवार म्हणाले, 'अडीच वर्षे महाविकास आघाडीने चांगले काम केले आहे. कोरोना काळातही महाविकास आघाडीने चांगले काम केले आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग फसला नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या बंडखोरीबद्दल काही गोष्टी समोर आल्या आहेत. बंडखोर परतल्यानंतर वस्तुस्थिती लोकांना समजेल. आमदार परत आले की सर्व स्पष्ट होईल. विधानसभेत बहुमत कोणाच्या बाजूने स्पष्ट होईल. अशी स्थिती महाराष्ट्राने अनेकदा बघितली आहे. यावर मात करून हे महाविकास आघाडी सरकार बहुमत सिद्ध करेल'.

दरम्यान, बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांना एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचे सांगितले. त्यावर शरद पवारांनी शिंदेंच्या वक्तव्यावर जोरदार टोलेबाजी केली. 'तुम्हीच शोधा त्यांच्यामागे कोणता राष्ट्रीय पक्ष आहे. पाठिंबा कुणाचा आहे हे सांगण्याची गरज नाही', असं शरद पवारांनी सांगितले. तसेच हिंदुत्वाच्या मुद्यावरून शरद पवार म्हणाले, 'एकनाथ शिंदे हे अडीच वर्ष आमच्याबरोबर होते. तेव्हा हिंदुत्व विषय नव्हता का ?, असा सवाल देखील शरद पवारांनी शिंदेंना केला. ईडीच्या कारवाईच्या भीतीने बंडखोरी केली का असाही आरोप करण्यात येत आहे,त्यावर पवार म्हणाले, 'तसा निष्कर्ष काढणे योग्य नाही. त्यातील काही जणांच्या विरोधात चौकशी सुरू आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chipi Airport : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबईहून सिंधुदुर्ग अवघ्या १ तासात, १५ ऑगस्टपासून चिपी-नवी मुंबई विमानसेवा सुरू

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर विरोधात ढाणकी शहर कडकडीत बंद

किडनी स्टोनच्या रुग्णांनी काय खावे आणि काय काय खाऊ नये?|Kidney Stone Diet Tips

Petrol-Diesel: पेट्रोल-डिझेलबाबत महत्वाची अपडेट, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Kaju Katli Recipe: खास कार्यक्रम किंवा सणासुदीसाठी घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट काजू कतली; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT