Sharad pawar Saam tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar News: '...तर मी स्वतः आंदोलनात सहभागी होणार', MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात; राज्य सरकारला इशारा

Sharad Pawar ON MPSC Student Protest Pune: काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पुण्यामध्ये आंदोलनस्थळी जाऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. यावेळी सुप्रिया सुळे यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करत आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

Gangappa Pujari

अक्षय बडवे| पुणे, ता. २२ ऑगस्ट २०२४

पुण्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे २५ तारखेची परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या विद्यार्थी आंदोलनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा देत सरकारला इशारा दिला आहे.

काय म्हणालेत शरद पवार?

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

सुप्रिया सुळे यांनी घेतली होती आंदोलकांची भेट!

काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पुण्यामध्ये आंदोलनस्थळी जाऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. यावेळी सुप्रिया सुळे यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करत आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तसेच याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी विद्यार्थ्यांना दिले होते.

परीक्षेची वेळ बदलण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून आज यासंदर्भात त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT