गृहमंत्री अमित शहांच्या आदेशानंतर एनसीबी डीजींच राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र  Saam Tv
मुंबई/पुणे

गृहमंत्री अमित शहांच्या आदेशानंतर एनसीबी डीजींच राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र

एनसीबीच्या महासंचालकांनी राज्यच्या पोलीस महासंचालकाचा एक पत्र पाठविण्यात आले

सुरज सावंत

मुंबई : एनसीबीच्या महासंचालकांनी राज्यच्या पोलीस महासंचालकाचा एक पत्र पाठविण्यात आले आहे. पत्रात राज्यातील महत्त्वाच्या पाच ड्रग्जच्या केसेस एनसीबीकडे वर्ग करण्याचे गृहमंत्री अमित शहा यांचे आदेश असल्याची माहिती मिळत आहे. गृहमंत्री अमित शाह यांचे आदेशानंतर एनसीबीच्या डीजीपींकडून केसेस वर्ग करण्यासाठी राज्याच्या डीजीपींना पत्र पाठविण्यात आले आहे. एनसीबीच्या पत्रानंतर पुन्हा केंद्र विरुद्ध सामना होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हे देखील पहा-

राज्य सरकार ड्रग्जच्या हायप्रोफाईल केसेस एनसीबीकडे देणार का याकडे लक्ष लागले आहे. कालच राज्याच्या डीजीपींना हे पत्र देण्यात आले आहे. या पत्रामध्ये प्रामुख्याने उल्लेख असा करण्यात आला आहे की, ड्रग्ज संदर्भातील महत्वाच्या ५ केसेस त्या एनसीबीकडे वर्ग करण्यात यावे, असे आदेश गृहमंत्री अमित शहा याचे आहे. या पत्रामध्ये वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे केंद्र विरुद्ध राज्य सरकार आणि केंद्र विरुद्ध एनसीबी सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Crime News: १४ वर्षीय मुलीचं बलात्कार, वर्गमैत्रिणीच्या वडिलांचं भयंकर कृत्य

Aadhaar Address Update : आता घरबसल्या बदला आधारवरील पत्ता; नवीन Aadhaar App मुळे प्रक्रिया झाली सोपी

Viral Video: ‘मी ड्रायव्हर आहे, नोकर नाही’, सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला ड्रायव्हरने टॅक्सीतून उतरवलं, व्हिडीओ झाला व्हायरल

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT