Nawab Malik Saam TV
मुंबई/पुणे

Nawab Malik: नवाब मलिकांना मोठा धक्का; ED कडून ८ मालमत्ता जप्त

ED कडून नवाब मलिक यांच्या विविध ८ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबई : राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयानं (ED) मोठी कारवाई केली आहे. मलिक यांच्या मुंबईसह इतर भागांतील विविध आठ मालमत्तांवर टाच आणली आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात ही मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

दाऊद इब्राहीमशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. या प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीनं आता त्यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील कुर्ला येथील जमिनीसह राज्यातील इतर भागांतील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. कुर्ला पश्चिमेकडील व्यावसायिक मालमत्ता, उस्मानाबादमधील १४७ एकर जमीन देखील ईडीनं जप्त केली आहे. जवळपास पावणेदोन महिन्यांपासून मलिक हे या प्रकरणात अटकेत आहेत.

मलिकांची जप्त केलेली संपत्ती -

हे देखील पहा -

गोवावाला कंपाऊंड, कुर्ला (पश्चिम)

एक व्यावसायिक युनिट, कुर्ला (पश्चिम).

उस्मानाबाद जिल्ह्यातील 59.81 हेक्टर शेतजमीन

कुर्ला पश्चिम इथले तीन फ्लॅट

वांद्रे पश्चिम इथले दोन फ्लॅटचा समावेश आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper: मुंबई-बंगळुरू प्रवास आता आणखी सुसाट! देशातील दुसरी 'वंदे भारत स्लीपर' तयार; किती डबे अन् मार्ग कोणता?

मिमिक्री अर्टिस्ट बोलायला लागले; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला

Health Care : महिनाभर केळी खाल्ली तर शरीवर काय परिणाम होतो?

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

BSNL Satellite Phone : iPhone पेक्षाही महाग BSNL चा सॅटेलाइट फोन! नेटवर्कशिवायही करता येणार कॉल

SCROLL FOR NEXT