चंद्रकांत पाटील । नवाब मलिक  SaamTvNews
मुंबई/पुणे

'मला खिशात टाकाच..' नवाब मलिकांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगत आहेत मी नवाब मलिक यांना खिशात ठेवतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील Chandrakant Patil यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक Navab Malik यांच्यासारखे नेते आपल्या खिशात ठेवतो असे वक्तव्य पत्रकारांशी बोलताना केलं होतं. पाटील यांच्या याच वक्तव्यावरती मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हे देखील पहा -

या पार्श्वभूमीवर मलिकांनी ट्विट Tweet करत "भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगत आहेत मी नवाब मलिक यांना खिशात ठेवतो. चंद्रकांत पाटलांचा खिसा इतका मोठा असेल हे मला माहीत नव्हत. तसेच मी वाट बघत आहे की ते कधी मला त्यांच्या खिशात टाकणार आहेत. तसेच त्यांनी मला खिशात टाकल्यावर त्यांच्या खिशात काय काय आहे हे जनतेसमोर आणणार आहे त्यासाठी चंद्रकांतजी मला तुमच्या खिशात टाकाच असं ट्विट मलिकांनी केलय सोबत चंद्रकांत पाटील बोललेले व्हिडीओ देखील त्यांनी शेअर केला आहे.

आर्यन खानला Aryan Khan अटक केल्यानंतर आणि समीर वानखेडेंवरती नवाब मलिकांनी अनेक आरोप केले तसेच क्रुझ पार्टी Cruise party प्रकरणात भाजपचे पदाधिकारी पंच म्हणून कसे असा आरोपही त्यांनी यावेळी केला होता तसेच भाजपाचे मोठमोठे नेते, त्यांच्याजवळचे लोक NCB च्या कार्यालयात जातात NCB अधिकाऱ्यांना भेटतात काही भाजपाचे नेते यांचे राईट हँड समीर वानखेडेला भेटत आहेत, हे मी जबाबदारीने सांगतोय. या हालचाली वाढल्या आहेत. जर पोपट पिंजऱ्यात गेला तर आणखीन गुपितं बाहेर येतील म्हणून जीन म्हणजेच भाजपाचे लोक घाबरायला लागले आहेत.तसेच हिवाळी अधिवेशनात मोठमोठी नावे बाहेर येणार असल्याचं वक्तव्य मलिकांनी केलं होत त्यांच्या याच वक्तव्यावरती पाटलांनी प्रतिक्रियी दिली होती.

त्यामुळे भाजप आणि मलिक असा वाद सुरु असतानाच आता त्यांनी केलेल्या या ट्विटमुळे आणखी राजकीय वाद उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सामच्या बातमीचा इम्पॅक्ट: नीट पेपरफुटीनंतर त्या इंटिग्रेटेड महाविद्यालयांवर होणार कारवाई, शिक्षण विभागाचे आदेश

Maharashtra News Live Update: आदिवासी बांधवाच्या जागेवर बेकायदेशीर घरकूल बांधकाम

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ११ उमेदवारांची घोषणा; कोण-कोणाला मिळालं तिकीट? जाणून घ्या

Face Care: चेहऱ्यावरचे डाग आणि टॅन कमी करुन ग्लोईंग चेहरा पाहिजे? रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT