नवाब मालिकांना परिणाम भोगावे लागणार, चंद्रकांत पाटलांचा इशारा Saam Tv
मुंबई/पुणे

नवाब मालिकांना परिणाम भोगावे लागणार, चंद्रकांत पाटलांचा इशारा

भारतीय जनता पक्षाला आणि देवेंद्र फडणवीस यांना ओढण्याचा प्रयत्न आहे आणि याचे मालिकांना परिणाम भोगावे लागतील.

अमोल कविटकर, पुणे

अमोल कविटकर

पुणे: मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. आज नवाब मलिक यांनी आणखी एक खळबळजनक खुलासा केला तो म्हणजे माजी मुख्यंमत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्स पेडलरशी संबंध असल्याचा. या आरोपांवर भाजप सुद्धा गप्प बसलेलं नाही. देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषदेत बोलताना, आम्ही दिवाळीनंतर बॉम्ब फोडू असा इशारा त्यांनी नवाब मलिक यांना दिला आहे. तर किरीट सोमय्या यांनी देखील नवाब मलिक यांच्या मध्ये एवढी कॅपॅसिटी नाही हे घाणेरडं राजकारण ठाकरे आणि शरद पवारांचं आहे असा आरोप केला आहे. तर आज भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील मलिक यांनी एकूणच फडणवीस यांच्यावर केलेलं आरोप आहेत तर सर्व आरोप बेछूट आहेत असं म्हंटल आहे.

हे देखील पहा-

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, भारतीय जनता पक्षाला आणि देवेंद्र फडणवीस यांना ओढण्याचा प्रयत्न आहे आणि याचे मालिकांना परिणाम भोगावे लागतील. पुरावे नसताना मलिक यांच्याकडून आरोप सुरु आहेत. २९ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यावर बोला मूळ मुद्दे भरकवटण्यासाठी मालिकांचे आरोप आहेत. समीर वानखेडे यांच्यासोबत अख्खा समाज आहे. सत्ता असताना तुम्हाला बेछूट आरोप का करावे लागते? सरकार तुमचं, चौकशी करा...

चंद्रकांत पाटील म्हणाले, नीरज गुंडे चांगला सामाजिक, काही मुद्दे असतील चौकशी करावी. CBI चौकशी करायची असेल तर खुशाल करावे. १९ महिन्यात आमचं काही वाकडे करु शकले नाहीत. उलट तुमच्याच मंत्र्यांवर आरोप आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

नीरज गुंड्डे कोण याबद्दल देवेंद्र फडणवीस सविस्तर बोलले आहेत आम्ही कोणाच्या नेत्याच्याही पत्नीवर बोललो नाही. पण अमृता वहिणींवर सातत्याने टीका केली जाते. देवेंद्रजींनी अजून किती संयम ठेवायचा? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT