नवाब मलिकांनी सांगितले सॅम डिसूझाचे खरे नाव Saam Tv
मुंबई/पुणे

नवाब मलिकांनी सांगितले सॅम डिसूझाचे खरे नाव

नवाब मलिक आज सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सॅम डिसूझावर ड्रग्ज प्रकरणी काही आरोप केले होते. मलिक यांनी सॅम डिसूझाचे खरे नाव यांनी सांगितले आहे. यासंदर्भात त्यांनी एनसीबीने सॅम डिसूझाला त्याच्या खऱ्या नावाने पाठवलेल्या नोटीसीचा फोटो देखील आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.

सॅम डिसूझाचा फोटो शेअर करत नवाब मलिक म्हणले की, ही व्यक्ती सॅम डिसूझा नाही. त्याचे खरं नाव सॅनविले स्टेनली डिसूझा असे आहे. एनसीबीने ड्रग्ज केस प्रकरणी त्याच्या खऱ्या नावाने नोटीस पाठवली आहे. तसंच नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी व्ही व्ही सिंग आणि सॅम डिसूझा यांच्यात फोनवर झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप सुद्धा ट्विट करत शेअर केली आहे.

दरम्यान, नवाब मलिक आज सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. काल ट्विट करत त्यांनी या पत्रकार परिषदेबाबत माहिती दिली. आता नवाब मलिक सॅम डिसूझा, मनिष भानुषाली आणि प्रभाकर साईल यांच्याबाबत आणखी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Healthy Food : ब्राऊन की व्हाईट, कोणता ब्रेड शरीराला हानिकारक? वेळीच सावध व्हा नाहीतर...

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

SCROLL FOR NEXT