मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते ! नवाब मलिक यांचं पुन्हा सूचक ट्विट... Saam Tv
मुंबई/पुणे

मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते ! नवाब मलिक यांचं पुन्हा सूचक ट्विट...

मंत्री नवाब मलिक यांनी आज देखील एक सूचक असं ट्विट केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मंत्री नवाब मलिक यांनी आज देखील एक सूचक असं ट्विट केलं आहे. पंच समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात मलिक यांनी हे सूचक ट्विट केलं असावं. माझं बोलणं बंद केलं तरी देखील माझ्या ध्येयाला आणि लढ्याला तुम्ही बंद करु शकत नाही, असं ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे.

नवाब मलिक यांनी गेल्या महिनाभरापासून पत्रकार परिषद घेत आहेत. एनसीबीची ड्रग्स पार्टी संदर्भात कारवाई, त्यातील पंच समीर वानखेडे यांनी केलेली कारवाई यावर नवाब मलिक 'फर्जीवाडा' याच शब्दात टीका करत आहेत. आणि कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. तसेच मलिक यांनी यासोबतच आपल्या सूचक शब्दात ट्विटची मालिका देखील सुरु ठेवली होती. समीर वानखेडे यांच्या वडिलांनी नवाब मलिक यांच्या विरोधात कोर्टात १.२५ कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. तर यायालयाने आज मलिक यांना त्यांची भूमिका मांडण्यास सांगितलं आहे. आता नवाब मलिक आज या प्रकरणावर नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

नवाब मलिक सोशल मीडियावरुन टार्गेट करतात, ज्ञानदेव वानखेडेंचा दावा;

ज्ञानदेव वानखेडे यांनी मानहानीचा दावा केला आहे. तर मलिक रोज सोशल मीडियावरून टार्गेट करत आहेत. त्यांना सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापासून मनाई करण्याचे आदेश देण्याची विनंतीही वानखेडे यांच्या वकिलांनी केली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक

Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? १२ खाती अन् इच्छुकांची यादी मोठी

Fact Check: काळ्या बुरशीचा कांदा खाल, जीवानं जाल? बुरशीयुक्त कांद्यामुळे किडनी, लिव्हरला धोका?

देवेंद्र फडणवीसांना केंद्रात नवी जबाबदारी? दिल्लीत भाजपच्या गोटात हालचाली

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT