आर्यन खान हा स्वत:हून तिकिट काढून गेला नव्हता; नवाब मलिक यांचा खुलासा  Saam Tv
मुंबई/पुणे

आर्यन खान हा स्वत:हून तिकिट काढून गेला नव्हता; नवाब मलिक यांचा खुलासा

अपहरणाचा मास्टरमाइंड हा मोहित कंबोज आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांची मालिका थांबायचे नाव घेत नाही आहे. या प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज आणखी  मोठे गौप्यस्फोट केले आहे. 2 ओक्टबरला संध्याकाळी बातमी आली कार्डिलियाची. मेगा स्टारच्या मुलाला ताब्यात घेतले म्हणून. 3 तारखेला आर्यन सोबत 8 लोकांना अटकेची बातमी आली आणि 6 तारखेच्या पत्रकार परिषदेत काही प्रश्न आम्ही उपस्थित केले. 

हे देखील पहा -

यावेळी दोन व्यक्ती केपी गोसावी जो आर्यांनला घेऊन जाताना समोर आला आणि दुसरा अरबाज मर्चंटला घेऊन जाणारा मनीष भानुशाली अश्या दोघांचा व्हिडिओ मी समोर आणला होता. ही दोन व्यक्ती कोण असल्याचं आम्ही विचारलं होतं. त्यानंतर आणखी एक खुलासा केला होता की, ८ ते १० लोकांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. एक वरिष्ठ अधिकारी खात्रीने का सांगू शकत नाही की नेमकं किती लोकांना अटक केली आणि ताब्यात घेतलं असा सवाल देखील मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. 

अकराशे कोटींच्या भ्रष्टाचार करणारी व्यक्ती मोहित कंबोजला भारतीय युवा मोर्चाचा अध्यक्ष केला. अपहरणाचा मास्टरमाइंड हा मोहित कंबोज आहे. मोहित कंबोज आणि वानखेडेचे चांगले संबंध आहेत. शहरात त्याची १२ हॉटेल्स आहेत आणि ती हॉटेल्स चालवण्यासाठी शेजारच्या हॉटेल्सवर खोट्या कारवायां करवून घेतल्या. न्यायालयाच्या कामकाजातही ही गोष्ट आली की, आर्यन खान हा स्वत:हून तिकिट काढून गेला नाही. तर त्याला प्रतिक गाबा आणि अमिर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून नेण्यात आले होते. हे पूर्ण प्रकरण अपहरण आणि खंडणीचे आहे. मोहित कंबोज यांच्या भाच्याच्या मदतीने हे सगळं जाळं पसरवण्यात आलं आहे. यात १८ कोटींचे डील झाले पण एका सेल्फीने सगळा खेळ बिघडला असा आरोप मलिक यांनी यावेळी केला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: अखेर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय; पुढील ५ दिवस या जिल्यात मुसळधार, IMD कडून अलर्ट

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Mumbai Local : लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत शांततेत दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींसाठी दिवस ठरणार गेमचेंजर; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

SCROLL FOR NEXT